Chana market news: हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट

राज्यात हरभऱ्याची काढणी सुरू आहे. मराठवाड्यात यावर्षी उतारा थोडा कमी मिळतोय. काढणी सुरू झाल्यामुळे बाजारात आवकही वाढत आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon

Chana Market News राज्यात हरभऱ्याची काढणी (Chana Harvesting) सुरू आहे. मराठवाड्यात यावर्षी उतारा थोडा कमी मिळतोय. काढणी सुरू झाल्यामुळे बाजारात आवकही वाढत आहे. हरभऱ्याला हमीभाव (Chana MSP) ५३३५ रुपये प्रति क्विंटल आहे. नाफेडची खरेदी (NAFED Chana Procurement) म्हणण्यापेक्षा आता केवळ नोंदणी हमीभावाने सुरू आहे.

आता सातबारा उतारा (२०२२-२३ च्या पेऱ्याची नोंद असलेला), बँक पासबुक आणि आधारची झेरॉक्स असे कागदपत्रे देऊन नाफेड खरेदी केंद्रावर नोंदणी करायची. नंतर त्यांचा मेसेज येईपर्यंत वाट पाहायची. यापूर्वी अनेक वेळा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज आलेच नाहीत.

Chana Market
Tur Chana Market : अकोला बाजार समिती तूर, हरभरा आवकेने फुल्ल

मेसेज आल्यावर हरभरा विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन जायचा. तेथे आपल्या नंबर नुसार काटा होणार, त्यासाठी वाट पाहायची.

काटा करून पावती मिळणार आणि पैसे खात्यावर जमा होतील, असे शेतकऱ्यांना सांगितले जाते. मुळात या सर्व प्रक्रियेला उशीर त्यात पैसे खात्यावर कधी जमा होतील, हे सांगता येत नाही.

या सर्व परिस्थिती चा फायदा गाव शिवारातील व्यापारी घेत आहेत. त्यांनी हमीभाव पेक्षा प्रति क्विंटल १००० रुपये कमी दराने खरेदी सुरू केली आहे. बहुतांश शेतकरी गावातील व्यापाऱ्यांना हरभरा ४३०० ते ४५०० रुपये दराने विकत आहेत. हे व्यापारी शेतातून किंवा घरून माल उचलून नगदी पैसे देतात.

Chana Market
Chana Procurement : सात-बारा अद्ययावत नसल्याने हरभरा नोंदणीत अडचण

शेतकऱ्याकडे माल ठेवायला जागा नसते. त्याला पैशाची अडचण असते. शेतातून घरी आणि घरून बाजारात हरभरा न्यायला वाहतूक, हमाली लागते.

बहुतांश शेतकरी बटाई नाही तर मक्त्याने शेत करतात. त्यांच्याकडे ना सातबारा असतो ना पिकाची नोंद. अशा सर्व अडचणींमुळे आणि नाफेड खरेदीच्या एकूणच प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट चालू आहे.

नाफेडच्या तूर, कांदा, हरभरा खरेदीचे मागील अनुभव खूप वाईट आहेत. शेतीमालाला जाहीर होणारे हमीभाव हा एक फार्स आहे. ते बहुतांश शेतीमालाला मिळतच नाहीत.

मी परवाच १० क्विंटल हरभरा ४३२५ रुपये प्रति क्विंटल दराने विकला. माझ्या बटाईदारास काही दिवस ठेवावा का म्हणून विचारले असता, तो म्हणे ठेऊन काही फायदा नाही. भाव काही जास्त वाढणार नाहीत.

डाळीची जोरदार आयात चालू आहे, हे त्यांनाही माहित आहे. तूर, सोयाबीन, कापूस ठेऊन काही फायदा झाला नाही आणि मला पैशाची गरज आहे, असे त्याचे उत्तर ऐकून मी ही विकून टाक म्हणालो.

हे आहे शेती अन् शेतकऱ्यांचे वास्तव.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com