Jowar Market : परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांत ज्वारीची कमी आवक

परभणी जिल्ह्यातील परभणी, मानवत, सेलू, जिंतूर या बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक झाली.
Jowar
Jowar Agrowon

Parbhani News :रब्बी ज्वारीची (Rabi Jowar) घटत गेलेला पेरा, त्यात मागील वर्षी पाऊसकाळ लांबल्याने उशिरा झालेल्या पेरण्या, त्यामुळे पीक काढणीस होत असलेला उशीर, वर्षभर घरी खाण्यासाठी राखून ठेवलेला ज्वारीसाठा आदी कारणांमुळे परभणी जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांत ज्वारीची आवक कमी आहे.

गेल्या आठवड्यात टाळकी ज्वारीला प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३८०० रुपये दर मिळाले आहेत. परभणी जिल्ह्यातील परभणी, मानवत, सेलू, जिंतूर या बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक झाली.

Jowar
Jowar Fodder : जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांना कडब्याची चिंता

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (ता. १०) ते शनिवार (ता. १५) या कालावधीत टाळकी ज्वारीची १३८ क्विंटल आवक झाली. ज्वारीला प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३८०० रुपये, तर सरासरी ३५५० रुपये दर मिळाले.

परभणी बाजार समितीत शुक्रवारी (ता. १४) ज्वारीची ५३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३३०० रुपये तर सरासरी ३१०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १२) ज्वारीची ८५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३८०० रुपये तर सरासरी ३२०० रुपये दर मिळाले.

Jowar
Jowar Importance : विविध पौष्टिक गुणधर्मांनीयुक्त ज्वारी

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१२) ज्वारीची ३४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २९७५ ते कमाल ३६५१ रुपये, तर सरासरी ३३०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ११) ११६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २४०० ते कमाल ३४०० रुपये, तर सरासरी ३२०० रुपये दर मिळाले.

गरजेपुरतीच ज्वारी बाजारात

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १३) ज्वारीची ३२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २००० ते कमाल ३२०० रुपये, तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती गुरुवारी (ता. १३) ज्वारीची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३४०० रुपये दर मिळाले. शेतकरी गरजेपुरत्या ज्वारीचीच विक्री करीत आहेत. बाकी ज्वारी वर्षभर खाण्यासाठी घरीच ठेवतात, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com