Sugarcane FRP : ‘महाराष्ट्र शुगर’चे दोन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर

तब्बल सहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर महाराष्ट्र शुगर कारखान्याकडे असलेले `एफआरपी’चे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

नांदेड : तब्बल सहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर महाराष्ट्र शुगर कारखान्याकडे (Maharshtra Sugar Mill) असलेले `एफआरपी’चे (Sugarcane FRP) दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले (Pralhad Ingole) यांनी दिली.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : ‘एफआरपी’त वाढीतील चलाखी

सोनखेड तालुक्यातील (जि. परभणी) महाराष्ट्र शुगर या कारखान्याने गाळप हंगाम २०१५-१६ मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी नेला. परंतु जानेवारी २०१६ नंतर नेलेल्या उसाचा एकही रुपया शेतकऱ्यांना दिला नाही. कालांतराने तो कारखाना बंद पडला. नंतर विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलने झाली. काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : ‘श्रीलक्ष्मी नृसिंह’कडील थकीत एफआरपी द्यावी

त्यावर आरआरसीच्या कारवाया झाल्या. अनेकवेळा लिलाव झाले तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. ऊस दर नियंत्रण मंडळाचे तत्कालीन सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी मंडळाच्या बैठकीत अनेकवेळा हा विषय लावून धरला होता. नंतर एनसीएलटी कोर्टातून हा कारखाना ट्वेन्टी शुगर या ग्रुपने विकत घेतला. ४ कोटी २२ लाख रुपये शेतकऱ्यांची देणी असताना एनसीएलटीने केवळ दोन कोटी देऊ केले. सदर पैसे कुणाचे आहेत याबाबत कोणतेही रेकॉर्ड नसल्याने हे पैसे द्यायचे कोणाला हा प्रश्‍न निर्माण झाला होता.

उच्च न्यायालयाचे निर्देश व राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केलेल्या सूचनेनुसार नवीन रेकॉर्ड तयार करण्यात आले. दोन कोटी रुपये परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे येऊन दोन वर्षे झाली तरीही ती मिळत नव्हती. सततचा पाठपुरावा करून अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी रुपये जमा करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com