Maize Rate : मक्याचा बाजार दबावात

देशातील बाजारात नव्या मक्याची आवक आता सुरु झाली. कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नवा मका बाजारात येत आहे. यंदा केंद्र सरकारनं मक्यासाठी १ हजार ९६२ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र नव्या मक्यामध्ये ओलावा अधिक येत असल्यानं दर हमीभावापेक्षाही कमी झाले.
Maize Rate
Maize RateAgrowon

पुणेः देशातील काही बाजारांमध्ये नव्या मक्याची आवक (Maize Arrival) सुरु झाली. मात्र पावसानं काढणीला (Maize Harvesting) आलेल्या मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान (Maize Crop Damage) केलं. तर बाजारात आवक होत असलेल्या मक्यामध्ये ओलावा (Maize Moisture) जास्त येत आहे. त्यामुळे नव्या मक्याला हमीभावापेक्षा जास्त दर (Maize Rate) मिळतो आहे.

देशातील बाजारात नव्या मक्याची आवक आता सुरु झाली. कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नवा मका बाजारात येत आहे. यंदा केंद्र सरकारनं मक्यासाठी १ हजार ९६२ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र नव्या मक्यामध्ये ओलावा अधिक येत असल्यानं दर हमीभावापेक्षाही कमी झाले. मागील १५ ते २० दिवस देशातील बहुतेक भागांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे मक्याची काढणी रखडलेली आहे. तर काही ठिकाणी मका सुकविण्याचे काम सुरु आहे.

Maize Rate
Maize Rate : मक्यातील तेजी का नरमली?

देशातील बाजारांमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत मका दरात तेजी होती. मात्र मक्याचे दर वाढल्याने पशुखाद्यात तांदूळ आणि बाजरीचा समावेश वाढला होता. त्यामुळं मक्याला उठाव कमी होऊन दर घटले. नव्या मक्यामध्ये ओलावा जास्त असल्यानं या मक्याला प्रतिक्विंटल १६०० ते २ हजार रुपये दर मिळतोय. तर जूना मका प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयाने विकला जात आहे.

Maize Rate
Maize Rate : मक्याचा बाजार कसा राहील?

मागील हंगामात २२६ लाख टन मका उत्पादन झालं होतं. देशात यंदा मका उत्पादन २३१ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज केंद्र सराकरनं जाहीर केला. मात्र ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसानं काढणीला आलेल्या मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यामुळं उत्पादनाला फटका बसणार आहे. सध्या देशातील बाजारांमधील आवक कमी असली तरी दिवाळीनंतर आवक वाढणार आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

देशात काही प्रमाणात जुना मका उपलब्ध आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने जुना मका मागे ठेवला होता. मात्र दर दबावात आल्यानं माल शिल्लक आहे. सध्या जूना मका प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयाने विकला जात आहे. नव्या मक्यातील ओलावा कमी झाल्यानंतर यादरम्यानच दर मिळतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com