Maize Procurement : छत्रपती संभाजीनगरमध्ये मका खरेदीला मुहूर्त नाही

Maize Market Update : आधारभूत किमतीच्या पुढे असलेले मक्याचे दर आता आधारभूत किमतीच्या आत आले आहेत. परंतु जिल्ह्यातील आधारभूत किमतीने मक्का खरेदी केंद्रावर अजून मक्याची खरेदी सुरू करण्यात आलेली नाही.
Maize Market
Maize MarketAgrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : आधारभूत किमतीच्या पुढे असलेले मक्याचे दर आता आधारभूत किमतीच्या आत आले आहेत. परंतु जिल्ह्यातील आधारभूत किमतीने मक्का खरेदी केंद्रावर अजून मक्याची खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. दुसरीकडे किचकट अटींच्या अधीन राहून झालेली हरभऱ्याची आजवरची खरेदी ही नगण्यच असल्याची स्थिती आहे.

शासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदी करण्यासाठी ९ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या खरेदी केंद्रांवरून ४६१ शेतकऱ्यांनी आपला हरभरा खरेदी केला जावा म्हणून आगाऊ नोंदणी केली होती. या सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी २८८ शेतकऱ्यांकडील ३४१३ क्विंटल हरभरा आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आला.

Maize Market
Maize Soybean Market : कापूस, मका, सोयाबीनमध्ये उतरता कल

खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी २१८ शेतकऱ्यांना त्यांच्या २५७१ क्विंटल हरभऱ्याचे चुकारे देखील अदा करण्यात आले. खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी ३१६९ क्विंटल हरभरा गोडाऊनमध्ये साठविण्यात आला. दुसरीकडे आधारभूत किमतीने मक्याची खरेदी मात्र अजूनही सुरू करण्यात आली नाही.

Maize Market
Maize Market : मक्याचे भाव वाढतील का?

मका खरेदीसाठी जिल्ह्यात करमाड, कन्नड, गंगापूर, लासूर स्टेशन, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्री व पैठण या दहा ठिकाणी केंद्र प्रस्तावित करण्यात आली. परंतु अजून या केंद्रांना खरेदीचा मुहूर्त लागला नाही. काही दिवसांपूर्वी मक्याचे दर दोन हजारांच्या पुढे गेले होते.

आता मात्र मक्याचे दर घसरून १७०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान सुरू आहेत. प्रत्यक्षात शासनाने मक्याचे आधारभूत दर १९६१ रुपये प्रतिक्विंटल ठरविले आहे. आधारभूत किमतीपेक्षा दीडशे ते दोनशे रुपये प्रतिक्विंटल मका कमी दराने खरेदी केला जात असताना शासनाकडून आधारभूत किमतीने मक्का खरेदीचा हस्तक्षेप केला जात नसल्याने मका उत्पादकांचे नुकसान होत असल्याची स्थिती आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com