Chandwad APMC : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत झेंडू लिलाव सुरू

पहिल्याच दिवशी ७५० क्रेट आवक; सरासरी ६२०० प्रतिक्विंटल दर
APMC
APMCAgrowon

नाशिक : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या (Marigold Producers) मागणीनुसार मुख्य बाजार आवारात सोमवारी (ता. ३) झेंडू फुलांचे (Marigold Flower) लिलाव सुरू झाले. पहिल्याच दिवशी ७५० क्रेट झेंडुच्या फुलांची (Marigold Flower Arrival) आवक झाली.

APMC
APMC Profit : खेड बाजार समितीला दोन कोटींचा नफा

पहिल्या दिवशी झालेल्या लिलावात लाल फुलास प्रतिक्विंटल किमान ३,००० ते कमाल ७,१०० तर सरासरी ६,२०० रुपये दर राहिला.पिवळ्या फुलास किमान ३,५०० ते कमाल ७,१०० तर सरासरी भाव ६२०० रुपये दर राहिला.

APMC
APMC : नामपूर बाजार समितीच्या सभेत गदारोळ

तसेच लाल कलकत्ता फुलास किमान ६,००० ते कमाल ८,१५० तर सरासरी दर ७,३०० रुपये मिळाला. शेतकऱ्यांनी झेंडू विक्रीस आणावा, असे आवाहन प्रशासक प्रेरणा शिवदास यांनी केले. चांदवडसह सटाणा व देवळा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी फुले विक्रीस आणली होती.

या वेळी रघु जाधव, दौलत ढोमसे, नवनाथ गांग़ुर्डे, रावसाहेब ढोमसे, सुभाष देशमाने, नवनाथ जाधव, उत्तम देशमाने तसेच बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. फुले खरेदीसाठी धुळे, मालेगाव, भिवंडी, चाळीसगाव, नाशिक, सूरत येथील खरेदीदार व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :

मोकळ्या फुलांचे लिलाव; खरेदीपश्चात रक्कम अदा

बाजार समितीच्या आवारावर विक्री होणाऱ्या शेतीमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी फुले प्रतवारी करून मोकळ्या स्वरूपात विक्रीस आणावी, असे बाजार समिती प्रशासक प्रेरणा शिवदास व सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, तसेच व्यापारी वर्गाने आवाहन केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com