कळमणा बाजारात आंब्याची आवक ११० क्‍विंटलवर

कळमणा बाजार समितीत कच्च्या आंब्याची आवक नियमीत होत असून उत्पादकतेत ३० टक्‍के घट आल्याने दरातही तेजी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
कळमणा बाजारात आंब्याची आवक ११० क्‍विंटलवर
MangoAgrowon

नागपूर ः कळमणा बाजार समितीत कच्च्या आंब्याची आवक नियमीत होत असून उत्पादकतेत ३० टक्‍के घट आल्याने दरातही तेजी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. सद्या कळमणा बाजार समितीत तेलंगणातील बेंगनपल्लीसह स्थानिक जातीच्या दशेहरी, लंगडा, पायरी या एकूण आंब्याची आवक ११० क्‍विंटलच्या घरात असून दर २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल आहेत.

गेल्या आठवड्यात दरात असलेली तेजी या आठवड्यात काहीअंशी संपुष्टात आली. गेल्या आठवड्यात आंब्याला ३५०० ते ४००० रुपये क्‍विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. तेलंगणातील बेंगनपल्ली या आंब्याची हंगामात मोठी आवक होते. एप्रिल ते जूनचा पहिला आठवडा या कलावधीत आंबा आवक होत असल्याचे सांगण्यात आले. भंडारा जिल्हयात आमराईंचे अस्तित्व कायम आहे. या भागातून तसेच महाराष्ट्र व लगतच्या मध्यप्रदेशातून होणारी आंबा आवक चांगली आहे. देशाच्या विविध भागात नागपूरातून आंबा पाठविला जातो. सद्या बाजारात मोसंबीची आवक होत आहे. मोठ्या आकाराच्या फळांची गेल्या आठवड्यात २०० क्‍विंटल इतकी आवक होती तर दर ४००० ते ५००० रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात आवक ६० क्‍विंटल तर दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर होते. केळीच्या दरात कोणत्याही प्रकारची सुधारणा नसून ४५० ते ५०० रुपये क्‍विंटलवर दर गेल्या तीन महिन्यांपासून आहेत. केळीची आवक ३० क्‍विंटल आहे. बाजारात सफरचंदाची आवक २ क्‍विंटल तर दर ११००० ते १३००० रुपये होते. द्राक्षाचे दर ६००० ते ८००० रुपये आणि आवक ८३ क्‍विंटल आहे. डाळिंब ४००० ते १२००० रुपये क्‍विंटल आणि आवक ४० क्‍विंटल झाली. चिकूला १००० ते ५००० रुपये क्‍विंटलचा दर असून आवक १७१ क्‍विंटलची नोंदविण्यात आली. केरळमधून होणारी अननसाची आवक ४०० क्‍विंटलवर पोचली आहे. व्यापारी उमराटे यांच्याकडे बारमाही अननसाची आवक होते. त्यांच्या माध्यमातून देशभरात अननसाचा पुरवठा केला जातो. सद्या अननसाचे दर १००० ते ५००० रुपये क्‍विंटल आहेत.

अशी आहे भाजीपाला आवक

कळमणा बाजारात बटाटा आवक मध्यप्रदेशातून मोठी होते. त्यानुसार सद्यःस्थितीत ती ३७८६ इतकी असून दर १३०० ते १४०० रुपये आहेत. कांदा दर ८०० ते १००० आणि आवक १५०० क्‍विंटलची आहे. लसूण आवक १४०० क्‍विंटल आणि दर ३०० ते १४०० रुपये होते. आले दर १६०० ते २००० आणि आवक ८४० क्‍विंटल झाली. वाळलेली मिरची ७००० ते १३००० रुपये आणि आवक १६०५ क्‍विंटल होती. टोमॅटो ३२०० ते ३५०० आणि आवक ५५० क्‍विंटलची झाली.

भुसार मालाची अशी आहे स्थिती

बाजारात ज्वारीची आवक १२ क्‍विंटल तर दर २२०० ते २५०० रुपये. सरबती गहू २४०० ते २७०० आणि आवक १००० क्‍विंटलची होती. तांदूळ दर २८०० ते ३२०० आणि आवक ३० क्‍विंटल. हरभरा आवक १४२० आणि दर ४००० ते ४२६० रुपये क्‍विंटल होते. तुरीची आवक ५८०० ते ६१०० आणि आवक ५२१ क्‍विंटल होती. मूग ५८००० ते ६००० रुपये आणि आवक ३० क्‍विंटलची नोंदविली गेली. सोयाबीन आवक ७७ क्‍विंटल आणि दर ६०७५ ते ६९०० रुपये होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com