Crop Loan : रब्बी पीककर्जाचे १३.६६ टक्के वाटप

परभणी जिल्ह्या या वर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात ऑक्टोबर अखेर ८ हजार ५३४ शेतकऱ्यांना ८५ कोटी ३४ लाख रुपये (१३.६६ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्या या वर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season) ऑक्टोबर अखेर ८ हजार ५३४ शेतकऱ्यांना ८५ कोटी ३४ लाख रुपये (१३.६६ टक्के) पीककर्ज वाटप (Crop Loan) करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत भारतीय स्टेट बँकेने पीककर्ज वाटपात (Crop Loan Allocation) आघाडी घेतली आहे. अद्याप जिल्ह्यातील नऊ बँकांनी कर्जवाटप सुरू केलेले नाही. शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी (Rabi Sowing) निविष्ठांच्या खरेदीसाठी पीककर्ज वाटपाची गती वाढविण्याची गरज आहे.

Crop Loan
Crop Damage Compensation : शेतकऱ्यांच्या तत्काळ मदतीची रक्कम द्या

परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात विविध बँकांना ६२४ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना ३६१ कोटी ७३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ८६ कोटी ९५ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२९ कोटी १८ लाख रुपये, खासगी बँकांच्या ४६ कोटी ९४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे. गत तुलनेत यंदा पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात १७ कोटी ८२ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

ता. ३१ ऑक्टोबरअखेरपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी ७ हजार १०४ शेतकऱ्यांना ७० कोटी ६९ लाख रुपये (१९.५४ टक्के) पीककर्ज वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १ हजार शेतकऱ्यांना १० कोटी ९८ लाख रुपये (१२.६३ टक्के), तर खासगी बँकांनी २३५ शेतकऱ्यांना ३ कोटी ६७ लाख रुपये (७.८२ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, युनियन बँक या सात राष्ट्रीयीकृत बँका, तसेच अॅक्सिस बँक या खासगी बँकेने पीककर्ज वाटप सुरू केले नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंतच्या कर्जवाटपात एकूण ६ हजार ९५८ शेतकऱ्यांनी ६८ कोटी ७ लाख रुपये एवढ्या रकमेच्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे. नवीन कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ हजार ६२५ असून, कर्जवाटपाची रक्कम १७ कोटी २७ लाख रुपये आहे.

रब्बी हंगाम पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये) ता. ३१ ऑक्टोबरपर्यंत

बँक उद्दिष्ट वाटप रक्कम शेतकरी संख्या टक्केवारी

भारतीय स्टेट बँक २३१.५८ ६७.४० ७१०४ २९.१०

महाराष्ट्र ग्रामीण बँक ८६.९५ १०.९८ १००० १२.६३

बँक ऑफ बडोदा २६.६९ २.६० १८७ ९.७४

बँक ऑफ इंडिया ४.८० ०.५१ ४२ १०.६७

इंडियन ओव्हरसीज बँक ४.२१ ०.१८ १५ ४.२८

एचडीएफसी बँक १५.४७ ०.५६ २४ ३.६२

आयसीआयसी बँक १२.२४ ३.०४ २०२ २४.८४

आयडीबीआय बँक १४.१६ ०.०७ ९ ०.४९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com