पावसाच्या पाण्यामुळे चाळीतील २१ ट्रॉली कांदा वाहून गेला

उत्पादनात घट आणि अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षने कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे साठवलेला २१ ट्रॉली कांदा पाण्यासोबत वाहून गेल्याने नुकसान झाले.
Onion
Onion Agrowon

नाशिक : कसमादे भागांत बुधवारी (ता. २२) झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. प्रामुख्याने जिल्ह्यातील कसमादे भागात, मालेगाव, सटाणा व कळवण या तालुक्यांत पाण्याच्या प्रवाह कांदा चाळीत शिरून कांदे वाहून (Onion Wash Out) गेल्याची घटना घडली. उत्पादनात घट आणि अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षने कांदा चाळीत साठवून (Onion Storage) ठेवला आहे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) साठवलेला २१ ट्रॉली कांदा पाण्यासोबत वाहून गेल्याने नुकसान झाले. (Onion Washed Away Due To Rain Water)

Onion
कृषी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्री सुरू

जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. तासभर झालेल्या पावसामुळे सर्व ओढे-नाले एक झाले होते. त्यामुळे सर्वत्र पाणी खळखळून वाहिले. अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे, पाझर तलाव भरले. खरिपातील हा दिलासा देणारा मानला जात असला तरी काही ठिकाणी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसान करणारा ठरला. जिल्ह्यात २ शेतकरी व एका शेतकरी उत्पादक कंपनीने साठवलेले कांदे चाळीतून वाहून गेले.

सर्वाधिक नुकसान सटाणा तालुक्यात झाले. तेथील कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या शेतात बांध फुटून पाणी थेट चाळीत आले. पाण्याचा लोंढा आल्याने चाळीतून १५ ट्रॉली माल वाहून शेतात गेला. चिखलात कांदा माखल्याने मोठे नुकसान झाले.

तळवाडे (ता. मालेगाव) येथील पांढरून शिवारात बुधवारी (ता. २२) रोजी पावसामुळे उंबरे नाल्याला पूर आल्याने पावसाचे पाणी प्रवाह बदलून चाळीत शिरले. त्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकरी शत्रुघ्न अहिरे यांच्या चाळीतून १ ट्रॉली कांदा वाहून गेला. कळवण शिवारात मुसळधार पावसामुळे कांदा चाळीत पाणी शिरून ५ ट्रॉली कांदे वाहून गेले. त्यामुळे पुनद ग्रीन व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीला मोठा फटका बसला. आता हा भिजलेला कांदा विकता येणार नाही, शिवाय विकला तर भावही मिळणार नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सध्या आमच्या कंपनीकडून नाफेड कांदा खरेदी सुरू आहे. त्यासाठी तेथे भाडेतत्त्वावर चाळी घेऊन माल साठवला होता; मात्र बांध ओलांडून पाणी वाहिल्याने ते शेतात घुसून चाळीत आले. त्यामुळे चार पाच ट्रॅक्टर कांदा वाहून गेला.
बाळासाहेब जाधव, अध्यक्ष-पुनद ग्रीन व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी.
चांदा चाळ नालीच्या ४०० फूट दूर अंतरावर आहे; मात्र परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने काही क्षणात पाणीपाणी झाले. वाहून आलेल्या पण्यासोबत कांदे वाहून गेले. सोबत जनावरांसाठी ठेवलेला एक ट्रॅक्टर मका चाराही वाहून गेला.
शत्रुघ्न अहिरे, शेतकरी, तळवाडे, ता. मालेगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com