‘महाएफपीसी’चा हरभरा खरेदीत धडाका

राज्यात तब्बल साडेबारा लाख क्विंटल खरेदी
Gram Procurement
Gram Procurement Agrowon

नांदेड : किमान आधारभूत किमतीनुसार शासकीय धान्य खरेदीत ठरावीक संस्थेची मक्तेदारी मोडीत काढून महाएफपीसी (MAHAFPC), पुणेचा यंदा राज्यात गावपातळीवर हरभरा खरेदीत (GramProcurement) धडका सुरू आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे (Farmer Producer Company) राज्यात आजपर्यंत तब्बल साडेबारा लाख क्विंटल पेक्षाअधिक क्विंटल हरभरा खरेदी (Procurement Of Gram) करून वेळेत चुकारे दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘नाफेड’साठी (NAFED) ‘द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन’कडून (The Maharashtra State Cooperative Marketing Federation) राज्यातील तालुका खरेदी- विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून धान्य खरेदी करत होते. परंतु मागील काही वर्षांपासून ‘नाफेड’ने शेतकरी उत्पादन कंपन्यांना या खरेदीत वाव मिळावा, यासाठी पुणे येथील ‘महाफार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड’ला एजन्सी नेमले. त्यांच्या अंतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादन कंपन्यांना शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मुभा दिली. एक मार्चपासून हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्याची मान्यता त्यांना मिळाली.

Gram Procurement
हरभरा बाजारात तेजीचे संकेत

शेतकऱ्यांना गावपातळीवर एमएसपीनुसार शेतीमाल विक्री करण्याची सुविधा निर्माण झाली. यात शेतकऱ्यांचा वेळ, तसेच गाडीभाड्यात मोठी बचत होऊन शेतीमाल त्वरित खरेदी होऊ लागला. तसेच धान्याचे चुकारेही लगेच मिळू लागले. राज्यात को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई, विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशन नागपूर, महाएफपीसी पुणे, पृथ्वाशक्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि, नगर आदी एजन्सीद्वारे हरभरा खरेदी करण्यात येत आहे. थेट ‘एफसीआय’साठी बीड, उस्मानाबाद, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांत शेतकरी उत्पादक कंपन्या हरभरा खरेदी करत आहेत.

वीस जिल्ह्यांत २८० ठिकाणी खरेदी

‘महाएफपीसी पुणे’तर्फे राज्यातील २० जिल्ह्यांत २८० ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे हरभरा खरेदी होत आहे. या ठिकाणी एक लाख ३३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आजपर्यंत ६६ हजार २७५ शेतकऱ्यांचा १२ लाख ४५ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाला. यात सर्वाधिक लातूर जिल्ह्यात तीन लाख २१ हजार क्विंटल, तर नांदेड जिल्ह्यात दोन लाख क्विंटल खरेदी झाली आहे. आगामी काळात २० लाख क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी होण्याचा अंदाज ‘महाएफपीसी’ने व्यक्त केला आहे.

‘महाएफपीसी’कडून जिल्हानिहाय खरेदी (क्विंटलमध्ये)

लातूर - ३,२१,१६४, नांदेड - १,९८,३८८, हिंगोली - १,८०,७३९, बुलडाणा - १,५०,९३३, अमरावती - ९२,८४३, जळगाव - ४५,७३४, यवतमाळ - ४४,५९४, परभणी - ४३,२९७, अहमदनगर - २१,९५०, भंडारा - १९,२३७, जालना - १५,५६१, धुळे ५,१००, नागपूर - ४,५४०, औरंगाबाद - ८६६, अकोला - ५०, सोलापूर - ५९,

शासकीय धान्य खरेदीत ‘एफपीओ’ उतरल्याने ठरावीक संस्थांची मक्तेदारी मोडीत निघाली. गावपातळीवर धान्य खरेदी होत असल्याने खरेदी व्यवहारात सकारात्मक बदल घडून आला आहे. शेतीमालाचे चुकारेही वेळेवर मिळत आहेत. शासनाच्या एकूण खरेदीपैकी ६० टक्के हरभरा खरेदी ‘महाएफपीसी’कडून होईल, अशी शक्यता आहे.
योगेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक, महाएफपीसी पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com