साखरनिर्यात अर्ज परवानगीसाठी पुरेसा वेळ दिला

साखरनिर्यात परवानगीचा घोळ अजूनही मिटण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
साखरनिर्यात अर्ज परवानगीसाठी पुरेसा वेळ दिला
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : साखरनिर्यात (Sugar Export) परवानगीचा घोळ अजूनही मिटण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. साखर उद्योगाकडून (Sugar Industry) जादा साखरनिर्यातीची मागणी (Sugar export Demand) होत असताना केंद्राने मात्र याचे खंडन करत आम्ही साखर कारखानदारांना निर्यातीचे अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. यामुळे गडबडीत निर्यातीला परवानगी दिली, असे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्राने एक ते तीन जूनअखेर पोर्टलवर परवानगी घेतलेल्या साखर कारखान्यांना मर्यादित स्वरूपात निर्यात कोटे दिले. अपेक्षेपेक्षा कमी साखर निर्यात करण्यास परवानगी दिल्याने साखर उद्योगातून नाराजी व्यक्त होत आहे. घाईगडबडीने केंद्र कमीत कमी साखरनिर्यात होईल अशा उपाययोजना करत असल्याचा आरोप साखर उद्योगामधून होत आहे. यावर केंद्राने हे स्पष्टीकरण दिले आहे.

२४ मे रोजी साखर कारखानदार आणि निर्यातदारांसाठी सूचना जारी केल्या होत्या आणि डीएफपीडीच्या संकेतस्थळावर पोस्ट केल्या होत्या. अर्जांवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर वेळेत प्रक्रिया करण्यात आली. ३ जून २०२२ पर्यंत २३ लाख टनांपेक्षा जास्त मागणी नोंदवण्यात आली. कालावधीत फक्त दहा लाख टन साखरनिर्यातीला परवानगी द्यायची होती, यानुसार कोटे विभागून दिल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com