शेतीमालाचा वायदेबाजारः कापूस, हळदीच्या किमतींत वाढ

कापूस, मका, मूग, सोयाबीन व तूर यांची आवक मार्च महिन्यात कमी होऊ लागली होती. हळद व हरभरा यांची आवक वाढत होती.
Agricultural Commodity
Agricultural CommodityAgrowon

फ्युचर्स किमतीः सप्ताह- २५ मार्च ते १ एप्रिल २०२२
मार्च महिन्यात कापूस, मका, मूग, सोयाबीन व टोमॅटो यांच्या किमती वाढत होत्या. हळद, तूर व कांदा यांच्या किमतीत उतरता कल होता. हरभऱ्याच्या किमतीत चढ-उतार होत होते.
कापूस, (Cotton) मका, मूग, सोयाबीन व तूर यांची आवक मार्च महिन्यात कमी होऊ लागली होती. हळद व हरभरा यांची आवक वाढत होती. कांदा व टोमॅटो (Onion- Tomatoes) यांच्या आवकेत चढ-उतार सुरू होते.

१ एप्रिल पासून (NCDEX) मध्ये मका व हळद यांचे ऑगस्ट २०२२ डिलिवरीसाठी व्यवहार सुरु झाले. MCX मध्ये कपाशीचे एप्रिल २०२३ डिलिवरीसाठी व्यवहार सुरु झाले.

(NCDEX) मध्ये गेल्या महिन्यापर्यंत मक्याच्या किमती खरीप पिकांच्या (छिंदवाडा डिलिवरी) होत्या. एक एप्रिल पासून त्या रबी पिकांच्या (गुलाबबाग डिलिवरी) असतील. गुलाब बाग किमती छिंदवाडा पेक्षा साधारणपणे रु. १३० ते रु. २२५ ने अधिक असतात.

Agricultural Commodity
कापूस तेजीला ब्रेक; दर टिकून

या सप्ताहात कापूस व हरभरा (Cotton - Gram) यांच्या किमती वाढल्या. हळदीच्या किमतीतसुद्धा वाढ झाली. सोयाबीन किमती स्थिर होत्या. बाजारातील तेजीचे वातावरण अजून काही दिवस कायम राहील. कांद्यातील घसरणीवर मात्र लक्ष ठेवणे जरूर आहे. पुढील काही महिने आवक वाढणार आहे.

किमतींतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) मार्च महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ७.७ टक्क्यांनी वाढून रु. ४०,९८० वर आले होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव पुन्हा ५.८ टक्क्यांनी वाढून रु. ४३,३७० वर आले आहेत. आहेत. मे डिलिवरी भाव ३.२ टक्क्यांनी वाढून रु. ४२,४७० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव ४.६ टक्क्यांनी वाढून रु २,१९८ वर आले आहेत.

मका
मक्याच्या (Maize) स्पॉट (गुलाबबाग ) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात त्या रु. २,४०० वर आल्या आहेत. फ्युचर्स (मे डिलिवरी) किमती रु. २,००८ वर आल्या आहेत. जुलै फ्युचर्स किमती रु. २,००८ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,८७० आहे. मक्याची मागणी वाढती राहणार आहे. पण रबी मक्याची आवकसुद्धा वाढती आहे.

हळद
हळदीच्या (Turmeric) स्पॉट (निझामाबाद) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या रु. ८,६९० वर स्थिर आहेत. मे फ्युचर्स किमती ४.७ टक्क्यांनी वाढून रु. ९,३५८ वर आल्या आहेत. हळदीची आवक वाढत आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या (Gram) स्पॉट (बिकानेर) किमती मार्चमध्ये चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ५,०६२ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे. आवक वाढत आहे.

Agricultural Commodity
Chana Bhav : शेतकऱ्यांनी हमीभावानेच हरभरा विकावा

मूग
मुगाची (Moog) स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ७,३५० होती; या सप्ताहात ती ७,१५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,२७५ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन
सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) मार्च महिन्यात वाढत होती. गेल्या सप्ताहात साप्ताहिक सरासरी किमत १.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,७७७ वर आली होती. या सप्ताहात ती ०.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,७६६ वर आली आहे. सोयाबीनचा (Soybean) हमीभाव रु. ३,९५० आहे.

तूर
तुरीची (Tur) स्पॉट किमत (अकोला) मार्च महिन्यात कमी होत होती. गेल्या सप्ताहात ती १.८ टक्क्यांनी घसरून रु. ६,०४२ वर आली होती. या सप्ताहात ती ०.७ टक्क्यांनी घसरून रु. ६,००० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,३०० आहे. तुरीची आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा
कांद्याची (Onion) स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. ९०८ होती; या सप्ताहात ती घसरून रु. ८०२ वर आली आहे. कांद्याच्या किमतीवर लक्ष ठेवणे जरुरीचे आहे. एप्रिल महिन्यात कांद्याची आवक वाढेल.

टोमॅटो
टोमॅटोची (Tomatoes) स्पॉट किमत (पिंपळगाव/नाशिक) गेल्या सप्ताहात रु. ९८८ होती; या सप्ताहात ती रु. ७५० वर आली आहे.
सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com