आणखी दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्या

पुढील हंगामाच्या प्रारंभी पुरेशी साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे. पोर्टलवरील माहितीच्या आधारे केंद्राने मागणीपेक्षा नऊ लाख टन कमी साखर निर्यातीला परवानगी दिली आहे.
आणखी दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्या
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : केंद्र सरकारने दहा लाख टन साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी दिल्यानंतरही साखर उद्योगाचे (Sugar Industry) समाधान झालेले नाही. सध्याचे उत्पादन (Sugar Production) पाहता आणखी दहा लाख टन साखर निर्यात (Export Of Sugar) करण्याची परवानगी देण्याची मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) (इस्मा) केंद्राकडे केली आहे.

यंदाच्या हंगामात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये साखरेचे जादा उत्पादन झाले आहे. यामुळे ३५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज सुधारून ३६० लाख टन करण्यात आला आहे. साखरेचे उत्पादन ३६० लाख टन होणार आहे. विक्रीचा आढावा घेतल्यास देशात २७५ लाख टन साखर विक्री होईल, असा अंदाज आहे. असे झाल्यास ६७ लाख टन साखर शिल्लक राहील.

पुढील हंगामाच्या प्रारंभी पुरेशी साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे. पोर्टलवरील माहितीच्या आधारे केंद्राने मागणीपेक्षा नऊ लाख टन कमी साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. दहा लाख टन साखर निर्यात झाल्यास जादा उत्पन्नाचा ताण साखर कारखान्यांवर येणार नाही, अशी शक्यता आहे. याचा विचार करून केंद्राने जादा साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी ‘इस्मा’ने केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com