अक्षय तृतीयेनिमित्त कोकणातून ३५ हजार हापूस पेट्यांची आवक

तयार आंबा गुरुवार, शुक्रवारनंतर सर्वसामान्यांच्या आवाक्यात
Mango Market
Mango MarketAgrowon

पुणे ः अक्षयतृतीयेच्या (Akshay Tritiya) निमित्ताने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune APMC) गेल्या दोन दिवसांत कोकणातून हापूसच्या (Hapus Arrival) सुमारे ३५ हजार पेट्यांची आवक झाली होती. आवकेमध्ये कच्‍च्या आंब्याची (Unripe Mango Arrival) आवक मोठी असल्याने, जुन्‍या खरेदीच्या आणि पिकलेल्या आंब्याची उपलब्धतता कमी असल्याने आणि मागणी वाढल्याने दर तेजीतच होते. प्रति डझनाचे दर ७०० ते १ हजारच्या दरम्यान होते. गेल्या दोन दिवसांत झालेल्या आवकेतील तयार आंबा गुरुवार, शुक्रवारनंतर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊन, दर ५०० रुपये डझन राहतील, असा अंदात आंब्याचे अडतदार आणि अडते असोसिएशनचे सचिव करण जाधव यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे कच्च्या आंब्याचे प्रमाण बाजारपेठेत जास्त आहे. हा आंबा पिकण्यास विलंब होत असल्याने पिकलेल्या आंब्याची उपलब्धता तुलनेने कमी आहे. तर कर्नाटक आंब्याची सुमारे ८ हजार पेट्यांची आवक झाली होती. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने मागच्या आठवड्यातील खरेदी आणि पिकलेल्या आंब्याची सुमारे १० ते १२ हजार पेट्यांची विक्री झाल्याचे कर्नाटक आंब्याचे घाऊक विक्रेते रोहन उरसळ यांनी सांगितले.

हापूस आंब्याचे दर

४ ते ६ डझन - कच्चा - १३०० ते २०००, पिकलेला - ३००० ते ५०००

६ ते १० डझन - कच्चा १८०० ते ३०००, पिकलेला - ३००० ते ५५००

कर्नाटक आंब्याचे दर

कच्चा हापूस - ४ ते ५ डझन -- ८००-१२००, पिकलेला १ हजार ५०० ते २ हजार रुपये

पायरी - ४ ते ५ डझन --६००-१०००, पिकलेला -- १००० ते १५००

लालबाग कच्चा (प्रति किलो) - ३०-५० रुपये, पिकलेला -५०-६०

बदाम - कच्चा (प्रति किलो) ४०-६०, पिकलेला - ६०-८०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com