
अनिल जाधव
पुणेः मागील महिनाभरापासून कापूस बाजाराचे (Cotton Market) लक्ष युएसडीएच्या (USDA) अहवालाकडं होतं. युएसडीए जागतिक कापूस उत्पादनाचा (Cotton Production) अंदाज कमी करेल, असं वाटतं होतं. पण युएसडीएनं उत्पादनासह वापरही कमी केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस नरमला. देशातील वायदेही तुटले. बाजार समित्यांमध्ये संमिश्र स्थिती राहीली. पण शेतकऱ्यांनी घाबरून न जाता धीर धरावा. सध्या उद्योगांकडून कापूस दरावर दबाव आणण्याचे काम सुरु असल्याचे जाणकारांनी सांगितले.
सर्वप्रथम आपण युएसडीए म्हणजेच अमेरिकेचा कृषी विभाग काय म्हणतो ते पाहू… युएसडीएनं डिसेंबरचा अहवाल नुकताच प्रसिध्द केलाय. युएसडीए आपल्या अहवालात जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करेल हे अपेक्षितच होतं. पण युएसडीएनं कापूस उत्पादनासोबत वापराचा अंदाजही कमी केलाय.
युएसडीएनं नोव्हेंबरमध्ये जागतिक उत्पादन ९०९ लाख गाठी होईल, असा अंदाज दिला होता. पण आता त्यात कपात करून ९०४ लाख गाठींवर आणला. एक कापूस गाठी १७० मात्र दुसरीकडं कापसाचा वापरही ८९८ लाख गाठींवरून ८७२ लाख गाठींपर्यंत कमी केलाय. जगातील महत्वाच्या देशांचा कापूस वापर कमी राहील, असं युएसडीएनं म्हटलंय. त्यात चीन, भारत, पाकिस्तान, अमेरिकेचा समावेश आहे.
सध्या कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. पण शेतकऱ्यांनी धीर धरावा. युएसडीए मागील चार महिन्यांपासून जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करत आहे. तर चीनमधील मागणी वाढण्याचाही अंदाज आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर सुधारण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
………….
युएसडीएच्या अंदजाचा परिणाम
- आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सव्वा टक्क्याने नरमले
- आज ८० सेंट प्रतिपाऊंडने कापसाचे वायदे पार पडले
- देशातही कापसाच्या वायद्यांमध्ये गाठीमागे २२० रुपयांची घट झाली
- आज देशातील कापूस वायदे ३१ हजार ५०० रुपयांवर बंद झाले.
- बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजा ५०० रुपये दर मिळाला.
- काही बाजारांमध्ये किंचित वाढ आणि घट पाहायला मिळाली.
………….
आवक कमी
एरव्ही डिसेंबर महिन्यात देशातील बाजारात कापसाची आवक जास्त असते. म्हणजे शेतकरी जास्त कापूस विक्री करतात. पण यंदा कापूस आवक गेल्यावर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे उद्योगाचं पोट दुखतंय. कापसाचे दर पाडून आवक वाढविण्यासाठी उद्योगाची धपड सुरु असल्याचं जाणकार सांगतात.
………..
गरजेपुरता कापूस विकावा
चालू महिन्यात दरात चढ उतार राहतील. मात्र पुढील महिन्यापासून कापूस दर सुधारु शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर न सोडता गरजेपुरता कापूस सध्या विकावा. पॅनिक सेलिंग टाळावं. कमी आवक राहील्यास बाजारभाव टीकेल. तसेच पुढील महिन्यात दर सुधारतील, असेही जाणकारांनी सांगितलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.