नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याच्या दरात घसरण

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये वालपापडी-घेवड्याची आवक १,७८० क्विंटल झाली.
Vegetable
Vegetable Agrowon

नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये वालपापडी-घेवड्याची आवक १,७८० क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४,००० ते ६,५०० असा तर सरासरी दर ५,२०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ५,००० ते १०,००० तर सरासरी दर ८,००० रुपये राहिला. गत दोन सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाल्याने दर कमी झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

लाल कांद्याची आवक १४,५७४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५० ते १,१०० तर सरासरी दर ७०० रुपये राहिला. लसणाची आवक ९४० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,५०० ते १०,००० तर सरासरी दर ८,६०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ९,२६० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १,६०० तर सरासरी दर १,१५० रुपये राहिला. आद्रकची आवक ४१६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९५० ते २,००० तर सरासरी दर १,६०० रुपये राहिला.

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले. हिरवी मिरचीची आवक ३४५ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ४,००० ते ५,५०० रुपये तर सरासरी दर ५,००० रुपये मिळाला. गाजराची आवक ३,३५५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,००० ते २,२०० तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला. फळभाज्यामध्ये टोमॅटोला ६० ते ४११ तर सरासरी २००, वांगी १५० ते ३३५ तर सरासरी २२५, फ्लॉवर ५० ते २३० सरासरी १५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला २५ ते ६५ तर सरासरी ४० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १४० ते २३० तर सरासरी दर १८० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ३० ते १५० तर सरासरी १२०, कारले २०० ते ३५० तर सरासरी २७५, गिलके ३०० ते ३५० तर सरासरी २६०, दोडका १७५ ते २५० तर सरासरी दर २०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १,४६९ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १,२५० तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक १९९ क्विंटल झाली. मृदुला वाणास ७५० ते ८,५०० तर सरासरी ६,००० रुपये दर मिळाला.

भाजीपाला प्रती १०० जुड्यांचा दर

पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी

गावठी कोथिंबीर...१,५००...५,०००...४,२००

कोथिंबीर हायब्रीड...१,२००...४,५००...३,४५०

मेथी...२,०००...४,२००...३,०५०

शेपू...१,५००...३,५००...२,२००

कांदापात...१,०००...३,०००...२,३००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com