भीमाशंकर कारखान्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, सोमवारपासून (ता. १३) घोडेगाव तहसील कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
भीमाशंकर कारखान्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात
Sugar FactoryAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
मंचर, ता. आंबेगाव : तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची (Bhimashankar Sugar Factory) पंचवार्षिक निवडणूक (Election) जाहीर झाली असून, सोमवारपासून (ता. १३) घोडेगाव तहसील कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा आंबेगाव जुन्नरचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी २०२२-२३ ते २०२७-२८ साठी भीमाशंकर साखर कारखान्याचा संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

कारखान्याच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. सभासदांनी निवडून द्यावयाचे प्रतिनिधी पारगावतर्फे अवसरी बुद्रुक, निरगुडसर गट तीन जागा, शिंगवे- रांजणी गट - तीन जागा, अवसरी बुद्रुक - पेठ गट- तीन जागा, मंचर - महाळुंगे गट-तीन जागा, घोडेगाव-शिणोली गट-तीन जागा. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था आणि पणन संस्था प्रतिनिधी एक जागा अनुसूचित जाती किंवा जमाती एक जागा, महिला राखीव प्रतिनिधी दोन जागा, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी एक जागा, भटक्या विमुक्त जाती व जमाती किंवा विशेष मागासप्रवर्गातील प्रतिनिधीसाठी एका जागेचा समावेश आहे.

नामनिर्देशन पत्र येत्या शुक्रवार (ता. १७) पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुटीचा दिवस वगळून) तहसीलदार कार्यालय, घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे दाखल करावयाचे आहेत.

नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवार (ता. २०) सकाळी ११पासून छाननी संपेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची मुदत मंगळवार (ता. २१) ते मंगळवार (ता. ५ जुलै) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, पात्र उमेदवारांचे अंतिम यादी व चिन्ह वाटप बुधवार (ता. ६ जुलै),
मतदान रविवार (ता. १७ जुलै) सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतमोजणी मंगळवार (ता. १९ जुलै) रोजी होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com