Chilli rate : कर्नाटकात ब्याडगी मिरचीचे दर दुप्पटीवर

ब्याडगी मिरचीच्या उत्पादनात घट होईल या भीतीने कर्नाटकात या मिरचीच्या किंमतीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
Chilly rate
Chilly rateAgrowon

ब्याडगी मिरचीच्या (Bidagi chilli ) उत्पादनात घट होईल या भीतीने कर्नाटकात या मिरचीच्या किंमतीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. कर्नाटकात ब्याडगी मिरचीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. ही मिरची कमी तिखटासाठी आणि तिच्या भडक अशा लाल रंगासाठी प्रसिद्ध आहे. यंदा मुसळधार पावसामुळे मिरचीच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. 

Chilly rate
Chilli Rate : पाकिस्तानमधील मिरची हब उद्धवस्त

सध्या मार्केटमध्ये ब्याडगी मिरचीच्या डब्बी जातीला प्रति क्विंटल २४,५२९ रूपये दर मिळतोय. वर्षभरापूर्वी याच कालावधीत १२,५०० रुपये दर होता.  

गेल्या आठवड्यात या जातीच्या मिरचीची कमाल किंमत ५६,१९९ रूपये क्विंटल होती, मागच्या वर्षी कमाल दर २१,००० रूपये होते. तर किमान दरातही दुपटीने वाढ होऊन ते ३००९ रूपयांवर पोहोचले आहेत. 

मागच्या आठवड्यात ब्याडगी कड्डी जातीच्या मिरचीच्या किंमती २२,८९९ रूपये होता. मागच्या वर्षी दर ९२९९ रूपये होते. 

Chilly rate
Green Chilli Rate : हिरव्या मिरचीचे दर तेजीत

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ब्याडगी मार्केटमध्ये मिरचीची आवक कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. राज्यभरात पिकाच्या विविध टप्प्यांत मोठा पाऊस झाल्याने उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. 

कर्नाटकातल्या कुंडागोल आणि अॅनिगेरीच्या आसपासच्या भागात मोठा पाऊस होऊन पाणी साचलं होतं, त्यामुळे मिरचीच्या पिकावर परिणाम झाला होता. तर उत्पादित मिरचीची गुणवत्ता खराब असल्याचं दिसलं.

येत्या आठवड्यात चांगल्या दर्जाच्या मिरच्या  बाजारात येण्याची अपेक्षा आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

बेल्लारीमध्ये बागायती जमिनीवर मिरचीचं पीक घेतलं जातं. रोगाचा प्रादुर्भाव झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकाची स्थिती चांगली आहे. त्याचप्रमाणे रायचूर भागातील पीकही चांगल्या स्थितीत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले.

उत्तर कर्नाटकात ज्या भागात मिरचीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, तिथं फळ परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. म्हणजे हिरव्या मिरच्या लाल होण्याच्या अवस्थेत आहेत. पिकलेल्या लाल मिरचीची कापणी करून बाजारात पाठवण्यापूर्वी उन्हात वाळवली जाते.

शितगृहांमधील (Cold storage) मिरच्यांचा कमी झालेला साठाही दरांना आधार देतोय. यंदा हंगामाच्या सुरुवातीला सुमारे ५ लाख पिशव्या मिरच्यांचा साठा असण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे २० लाख पिशव्या साठा होता. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com