आंबा हंगामाचा कडू शेवट

आंबा हंगाम संपला असून यावर्षी आंबा बागायतदारांसाठी फळमाशी सर्वाधिक उपद्रवी ठरली आहे. या माशींमुळे कोट्यवधी रुपयांचा आंबा खराब झाला.
आंबा हंगामाचा कडू शेवट
MangoAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः आंबा हंगाम (Mango Season) संपला असून यावर्षी आंबा बागायतदारांसाठी फळमाशी सर्वाधिक उपद्रवी ठरली आहे. या माशींमुळे कोट्यवधी रुपयांचा आंबा खराब (Mango Damage) झाला. त्यामुळे भविष्यात फळमाशींचा उपद्रव आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये (Mango Farmer) चिंता आहे.

बदलत्या वातावरणाचा मोठा फटका यावर्षी आंब्याला बसला. पालवी येण्याच्या कालावधीपासून ते अगदी आंबा हंगाम संपेपर्यंत वातावरणाचा त्रास बागायतदारांना सहन करावा लागला. यावर्षीचा आंबा हंगाम आता संपला आहे. आंब्यावर यावर्षी थ्रीप्स, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवला. त्यानंतर फेब्रुवारीत पाऊस पडल्यानंतर बुरशीचे प्रमाण देखील वाढले. परंतु या हंगामात सर्वाधिक उपद्रव फळमाशींचा झाला आहे. या फळमाशींची बीजे गेल्यावर्षी ‘तौक्ते’ वादळात रोवली गेल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

गेल्यावर्षी १६ आणि १७ मे रोजी कोकणात ‘तौक्ते’ चक्रीवादळाने हाहाकार उडविला होता. या वादळात मोठ्या प्रमाणात फळे जमिनीवर कोसळली. ही बहुतांशी फळे पडलेल्या जागीच कुजली. त्यातून मोठ्या प्रमाणात फळमाशींची निर्मिती झाली. या फळांवर कीटकनाशकांची फवारणी करून त्या फळांची विल्हेवाट लावावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले होते. परंतु काही मोजक्या बागायतदारांनी तो पर्याय निवडला. उर्वरित बागायतदारांनी आंब्याची फळे तशीच ठेवली. त्यामुळे यावर्षी सुरुवातीपासूनच फळमाशींचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र कच्च्या फळावर प्रादुर्भाव दिसून येत नाही. परंतु फळे परिपक्व झाल्यानंतर तो दिसून येतो. त्यामुळे यावर्षीच्या हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून आला. इतर कीड-रोगांपेक्षा यावर्षीच्या हंगामात सर्वाधिक उपद्रव फळमाशींचा झाल्याचे बागायतदारांकडून सांगितले जात आहे. फळमाशीमुळे खराब झालेला कित्येक टन आंबा बागायतदारांना फेकून द्यावा लागला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान यावर्षी बागायतदारांचे झाले आहे. भविष्यात देखील फळमाशींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंता आहे.

गेल्यावर्षी तौक्ते वादळात मोठ्या प्रमाणात फळांची पडझड झाली. पडलेल्या फळांची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. त्याप्रमाणे बागायतदारांना आवाहन देखील करण्यात आले होते. परंतु काहीच शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे कार्यवाही केली. अधिकतर बागांमध्ये पडलेली फळे कुजून गेली. त्यापासून फळमाशींची बीजनिर्मिती झाली. त्यामुळे जरी यावर्षी फळमाशींचा प्रादुर्भाव दिसत असला तरी त्याची बीजे तौक्ते वादळातच रोवली गेली होती.
डॉ. दामोदर विजय, शास्त्रज्ञ, फळसंशोधन उपकेंद्र, रामेश्वर, ता. देवगड,

*यावर्षी सरासरीच्या ३० ते ४० टक्केच उत्पादन.

*मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतिडझनचा दर ५०० ते ६०० रुपये.

*मे अखेरला दर घसरून ते प्रतिडझन ३०० रुपयांवर आले.

*मार्चपासून खऱ्या आंबा हंगामाला सुरुवात.

*३० मे ला आंबा हंगामाची सांगता.

*कॅनिंगला ५० हजार टन आंबा,

*कॅनिंगला सुरुवातीला प्रति किलो ३३ रुपये दर होता,त्यानंतर प्रति किलो २८ रुपये झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com