Cotton Rate : कापूस दर कितीने नरमले?

चालू आठवड्यात सोमवारपासून आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात सुधारणा होत होती. काल सायंकाळपर्यंत कापूस वायदे अगदी तेजीत होता. पण शेवटच्या सत्रात माशी शिंकली आणि बाजार नरमला. कापसाचे वायदे जवळपास ५ टक्क्यांनी तुटले होते. पण आज कापसाचे वायदे पुन्हा वाढले.
  Cotton Rate
Cotton RateAgrowon

अनिल जाधव

पुणेः चालू आठवड्यात सोमवारपासून आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात (Cotton market) सुधारणा होत होती. काल सायंकाळपर्यंत कापूस वायदे अगदी तेजीत होता. पण शेवटच्या सत्रात माशी शिंकली आणि बाजार नरमला. कापसाचे वायदे जवळपास ५ टक्क्यांनी तुटले होते. पण आज कापसाचे वायदे पुन्हा वाढले. तर देशातील बाजारातही कापूस दर काहीसे नरमले होते.

  Cotton Rate
Tur Rate : तुरीचे दर कितीने नरमले ?

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात काल कापसलाने मागील दोन महिन्यांतील उच्चांकी दर गाठला होता. काल दिवसभरात कापसाला ८८.२० सेंटचा सर्वाधिक दर मिळाला. रुपयात हा दर १६ हजार रुपये प्रतिक्विंटल होतो. मात्र त्यानंतर शेवटच्या सत्रात कापूस दरात घसरण झाली. ८४.२३ सेंटवर म्हणजेच १५ हजार ३५० रुपये  काल वायदे  बंद झाले होते. मात्र, आज कापसाच्या वायद्यांमध्ये पुन्हा सुधारणा झाली. आज कापसाचे वायदे ८५.२५ सेंट अर्थात १५ हजार ५०० रुपयांवर पोचले. पण कालच्या उच्चांकी दराच्या तुलनेत रुईचे दर क्विंटलमागे ५०० रुपयांनी कमीच आहेत.

  Cotton Rate
Cotton Rate : कापूस दर नरमले

काल कापसाचे वायदे नरमले, मात्र प्रत्यक्ष कापूस खरेदीचे दर नरमले नाहीत. वायद्यांमध्ये कापूस दर नरमले तरी प्रत्यक्ष खरेदीचा दर वाढलाय. कापसाचा काॅटलूक ए इंडेक्स १०५.५५ वर पोचला. काॅटलूक ए इंडेक्स हा जगातील विविध देशांतील प्रत्यक्ष कापूस खरेदीच्या दराची पातळी दर्शवितो. म्हणजेच विविध देशांतील शेतकऱ्यांना मिळणारा दर काॅटलूक ए इंडेक्समधून समजतो. काल वायदे कमी झाले तरी प्रत्यक्ष खरेदीचे दर कमी झालेले नाहीत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर नरमण्याची दोन कारणं सांगितली जातात. एक म्हणजे चीनमध्ये वाढणारा कोरोना आणि अमेरिकेची मागील आठवड्यात कमी झालेली कापूस निर्यात. चीनमध्ये कोरोनामुळं परिस्थिती आणखी बिघडली तर त्याचा चीनचा बाजार आणि उद्योगावर परिणाम होऊ शकतो. त्यातच चीन हा कापसाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. चीनची मागणी कमी झाली, तर त्याचा आंतरराष्ट्रीय कापूस बाजारावर परिणाम होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली.


दरात नरमाई ?
देशातील वायद्याचा विचार करता, डिसेंबरच्या वायद्यांमधील दर प्रतिगाठीमागे ३३० रुपयांनी नरमले. एक गाठ १७० किलो रुईची असते. आज कापसाचे वायदे २९ हजार ५१० रुपयांवर होते. एमसीएक्स अर्थात मल्टी कमोडिटी एक्सचेंजने जानेवारी २०२३ आणि त्यापुढील कापूस वायदे आजूनपर्यंत आणले नाहीत. याविषयी एमसीएक्सकडे चौकशी केली असता, वायद्यांच्या अटी आणि शर्तींमधील सुधारणा करण्याचे कम सुरु आहे, असं सांगण्यात आलं. तर बाजार समित्यांमधील दरही आज नरमले होते. कापसाच्या दरात आज क्विंटलमागे सरासरी २०० रुपयांनी दर कमी झाले होते. आज कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ९ हजार रुपये दर मिळाला.


डिसेंबरमध्ये दर नरमतात
देशातील कापसाचे दर डिसेंबर महिना सुरु झाल्यापासूनच दबावात आले होते. त्यात आता जास्त नरमाई आली. पण एरवी, डिसेंबर आणि जानेवारीच्या मध्यापर्यंत कापसाची आवक जास्त असते. या कालावधीत कापसाच्या दुसऱ्या तर काही ठिकाणी तिसऱ्या वेचण्या होतात. त्यामुळं बाजारातील आवक जास्त राहून दर कमी झालेले असतात. सध्या तोच अनुभव येत आहे.

काय राहील दरपातळी?
पण यंदा कोरोनानं थोडीशी चिंता वाढवली. त्यामुळं शेतकऱ्यांनी याकडंही लक्ष द्यावं. तसंच कापसाची विक्री एकदम करून बाजारावर दबाव न आणता, टप्प्याटप्यानं विक्री करावी. पुढील महिनाभरात कापूस दर सुधारू शकतात. त्यामुळं कापसाला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com