केंद्र सरकारची १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी

गहू निर्यातीबाबत प्रत्येक पतपत्राची (एलसी) छाननी करणाऱ्या केंद्र सरकारने १० लक्ष टन साखर निर्यातीला संमती दिली आहे.
केंद्र सरकारची १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी
Sugar ExportAgrowon

पुणे ः गहू निर्यातीबाबत (Wheat Export) प्रत्येक पतपत्राची (एलसी) (Letter Of Credit) छाननी करणाऱ्या केंद्र सरकारने १० लक्ष टन साखर निर्यातीला संमती दिली आहे. निर्यातीसाठी अर्ज केलेल्यांना ही निर्यात करता येणार आहे. साखर निर्यातीस मंजुरी (Approval For Sugar export) मिळालेल्या कंपन्यांमध्ये श्री दत्त इंडियाला १ लाख ७७ हजार १४१ टन निर्यातीची परवानगी देण्यात आली. श्री रेणुका शुगर्सला १ लाख ३७ हजार ४१५ टन आणि गार्डन कोर्ट डिस्टिलरीजला १ लाख ३ हजार ४२४ टन निर्यातीची (Sugar Export) परवानगी देण्यात आली आहे.

एकूण ६२ साखर कारखाने आणि निर्यातदारांनी नॅशनल सिंगल विंडो सिस्टिम्सच्या माध्यमातून २.३ दशलक्ष टन साखर निर्यातीसाठी ३२६ प्रस्ताव दाखल केले होते. या सर्व प्रस्तावांचा विचार करून केंद्रीय अन्न मंत्रालयाने १ दशलक्ष टन साखर निर्यातीस संमती दिली असून ९० दिवसांच्या आत निर्यात करण्याची सूचना केली आहे.

निर्यातीस संमती मिळालेल्या कंपन्यांना दर आठवड्याला या संदर्भातील प्रोग्रेस रिपोर्ट साखर संचलनालयाकडे दाखल करायचा आहे. सरकारने यापूर्वी ठरवल्याप्रमाणे कारखान्यांना १ दशलक्ष टन साखर निर्यातीची संधी दिली तर चांगले झाले असते, कारखान्यांना त्यांची साखर निर्यात करता आली असती, अशी प्रतिक्रिया कारखानदारांकडून व्यक्त करण्यात आली.

साखर निर्यातीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली यंत्रणा अपुरी आहे, या माध्यमातून होणाऱ्या निर्यातीचे प्रमाणही पुरेसे मोठे नाही, त्यामुळे सरकारने निर्यातीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार असल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com