मंगळवारपर्यंत ८० हजार टन ऊसगाळपाचे आव्हान

नांदेड विभागात तीन जिल्ह्यांचा हंगाम आटोपला
मंगळवारपर्यंत ८० हजार टन ऊसगाळपाचे आव्हान
Sugarcane CrushingAgrowon

नांदेड : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील गाळप हंगाम (Crushing Season) आटोपला आहे. त्यामुळे सर्व कारखाने बंद (Sugar Mill) झाले आहेत. परंतु लातूर जिल्ह्यात ८० हजार ६२५ टन ऊस शिल्लक (Excess Sugarcane) आहे. त्यामुळे येथील पाच कारखाने सात जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. यामुळे या कारखान्यांसमोर दोन दिवसांत शिल्लक ऊसगाळप (Sugarcane Crushing) करण्याचे आव्हान आहे.

नांदेड विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांत ‘गाळप हंगाम २०२१-२२’ साठी २७ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. यात नऊ सहकारी, तर १८ खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांतील सर्वच १७ साखर कारखाने व लातूर जिल्ह्यातील पाच असे एकूण २२ कारखाने बंद झाले आहेत. परंतु लातूर जिल्ह्यात अद्याप पाच कारखाने सुरू आहेत. यात साईबाबा शुगर्स शिवणी, रेणा सहकारी साखर कारखाना सिंधगाव, विकास सहकारी साखर कारखाना तोंडार, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, चिंचोलीराव वाडी व ट्वेंटिवन शुगर लि. माळवटी या कारखान्यांचा समावेश आहे.

दरम्यान, विभागात तीन जूनपर्यंत एक कोटी ४६ लाख ५२ हजार ७३ टन उसाचे गाळप झाले. तर एक कोटी ५२ लाख ५६ हजार ६६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. विभागाचा सरासरी साखर उतारा १०.४१ टक्के आहे.

कारखानिहाय ऊसगाळप, साखर उत्पादन

जिल्हा...कारखाने...ऊसगाळप (टनांत)...साखर उत्पादन (क्विंटल)

नांदेड...सहा...२५,३०,७०७...२४,७९,०३५

लातूर...१०...५९,२६,५७०...६२,९९,७१०

परभणी...सहा...४०,४६,७८७...४२,१३,७४५

हिंगोली...पाच...२१,४८,००८...२२,६४,१७०

एकूण...२७...१,४६,५२,०७३...१,५२,५६,६६०

नांदेड विभागातील हंगाम संपत आला आहे. लातूर जिल्ह्यातील शिल्लक ऊस सात जूनपर्यंत संपविण्यात येणार आहे. यासाठी ऊस असलेल्या गावात सर्वच यंत्रणा उतरवून त्या गावातील ऊसतोड पूर्ण करण्यात येईल. सात जूनपर्यंत नांदेडचा गाळप हंगाम संपेल.
सचिन रावल, प्रादेशिक सहसंचालक, (साखर) नांदेड विभाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com