राज्यातील ‘नाफेड’च्या कांदा खरेदीत गौडबंगाल

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप; केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार
राज्यातील ‘नाफेड’च्या कांदा खरेदीत गौडबंगाल
Onion ProductionAgrowon

नाशिक : राज्यात ‘नाफेड’अंतर्गत (NAFED) २.५० लाख टन कांदा खरेदीचे (Onion Procurement) उद्दिष्ट ठेवून खरेदी चालू आहे. मात्र कांदा खरेदीत उत्पादकांना (Onion Grower) वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळे दर दिले जात आहेत. हे बरोबर नसून एकाच राज्यामध्ये कांद्याला वेगवेगळे दर (Onion Rate) देणे योग्य नाही. ‘नाफेड’ने एकाच भावाने कांदा खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा केली आहे. खरेदीत गौडबंगाल आहे. १६ जूनच्या ‘नाफेड’च्या खरेदी दरात पुणे व नाशिक जिल्ह्यांतील भावात क्विंटलमागे २८० रुपये फरक आहे. तो कसा, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.

संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी या बाबत निवेदन दिले आहे. मागील महिन्यातील २१ व २२ मे रोजी नाशिक व पुणे जिल्ह्यांतील प्रतिक्विंटल दर अनुक्रमे १,१८०.१७ व १,०३७.५० असे होते. त्यात नाशिकचा दर जास्त होता. मात्र १६ जून रोजीच्या खरेदीत नाशिकचा दर १,५०९ व पुणे जिल्ह्याचा दर १,७८७ इतका आहे. या दरात २८० रुपयांचा फरक का, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

दराच्या संदर्भात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कृषी मंत्रालयाकडे पुराव्यादाखल ‘नाफेड’अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यांतील खरेदीच्या दरातील तफावत निदर्शनास आणून दिली असल्याचे पत्रात नमूद आहे. या बाबत ‘नाफेड’चे वरिष्ठ व केंद्रीय कृषिमंत्र्यांनी खुलासा करावा. केंद्रीय मंत्री डॉ. पवार यांनी वरिष्ठ पातळीवर चौकशी करुण न्याय द्यावा, समानभावाने नाफेडने कांदा खरेदी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

जिल्हानिहाय दरातील तफावत अशी...

जिल्हा...२१ व २२ मे...१६ जून २२

नगर...१,०४६.८९...१,५९५.००

बीड...१,०४६.८९ ...१,५९५.००

उस्मानाबाद...१,०४१.६७...१,६३३.००

औरंगाबाद...७९३.३३....१,२७५.००

हिंगोली....७९३.३३....१,२७५.००

पुणे...१,०३७.५०...१,७८७.००

नाशिक...१,१८०.१७...१,५०९.००

धुळे...१,१८०.१७...१,५०९.००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com