Cotton Market : कापूस दरातील वाढ आजही कायम

बाजारातील कापूस आवकही आज वाढली
Cotton Market
Cotton Market Agrowon

पुणेः नवीन वर्षातील बाजाराचा पहिलाच दिवस कापूस उत्पादकांसाठी (cotton arrival) आशादायक ठरला. मागील आठवड्यात शेवटच्या दोन दिवसांमध्ये कापसाचे भाव (Cotton Market) वाढले होते. कापूस भावातील वाढ (cotton bajarbahv) आजही कायम होती. अनेक बाजारांमध्ये आज कापसाचे भाव (cotton rate) १०० ते २०० रुपयाने वाढले होते. 

डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात कापूस दरात मोठे उतार झाले होते. सरासरी ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांपर्यंत दर घसरले होते. मात्र बाजारातील चित्र स्पष्ट होत गेलं तसे दरही वाढले. शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दर ७ हजार ३०० ते ८ हजार ७०० रुपयांपर्यंत पोचले होते.

Cotton Market
Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त होऊनही देशात खाद्यतेल महाग का ? |

आजही म्हणजेच २ जानेवारीला कापसाचे दर क्विंटलमागे १०० ते २०० रुपयाने वाढले. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कापूस दरात सुधारणा झाली होती. आज देशात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ९०० रुपये दर मिळाला. दर सुधारल्यानं आज कापूस बाजारातील आवकही काहीशी वाढली होती.

राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात आज सरासरी कापूस दरानं सर्वच बाजार समित्यांमध्ये ८ हजारांचा टप्पा पार केला. सरासरी म्हणजेच सर्वसाधारण दर. एखाद्या बाजारात जास्तीत जास्त कापूस ज्या दराने विकला जातो, तो सरासरी किंवा सर्वसाधारणा दर असतो. म्हणजेच हा दर जास्त शेतकऱ्यांना मिळतो. तर किमान किंवा कमाल दर मोजक्याच शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळं आपण नेहमी सरासरी दराचा विचार करतो. आता तुम्हा म्हणालं, हे आधीच सांगून झालं. पुन्हा तेच ते नका सांगू. पण अनेकदा दरावरून गैरसमज पसरवले जातात म्हणून सांगण गरजेचं आहे.

आजची दरपातळी

राज्यात आज कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. म्हणजेच राज्यातही दर १०० ते २०० रुपयाने वाढले. तसंच काही बाजारांमधील कमाल दर यापेक्षाही जास्त होते. राज्यातील काही बाजारांमध्ये कापसाचा कमाल म्हणजेच जास्तीत जास्त दर ८ हजार ८०० रुपयांवर पोचला होता. पुन्हा इथं एक गोष्ट लक्षात घ्या ! हा दर एका गाडीतील कापसाला मिळाला. बाजारातील सर्वच कापसाला नाही. त्यामुळं गैरसमज करून घेऊ नका. बाजारातील सर्वसाधारण दर विचारात घेवून बाजारात कापूस नेल्यास आपला हिरमोड होणार नाही.

Cotton Market
Shekhar Gaikwad : शेतजमिनीचे खटले वर्षानुवर्षे का चालतात?

काय राहील दरपातळी?

राज्यातील कापसाची दरपातळी आता ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. ज्या शेतकऱ्यांना कापूस विकायचा ते या भावात काही कापूस विकून आपली गरज भागवू शकतात. कारण आता राज्यातील सर्वच बाजारांमधील सरासरी दर या पातळीवर पोचलेत. पण देशातील कापूस बाजारात पुढील काही दिवस आपल्याला चढ उतार दिसू शकतात. मात्र कापूस दर वाढतील. शेतकऱ्यांना सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळू शकतो. पण शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापूस विक्री केली तर फायदेशीर ठरेल, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलं.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com