श्रीलंकेला पतकर्जात ५५ दशलक्ष डॉलर वाढ

भारत सरकारने श्रीलंकेला युरिया खताच्या आयातीसाठी पतकर्जात (क्रेडिट लाइन) ५५ दशलक्ष डॉलरची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेला पतकर्जात ५५ दशलक्ष डॉलर वाढ
Fertilizer ImportAgrowon

कोलंबो, श्रीलंका (वृत्तसंस्था) : भारत सरकारने श्रीलंकेला युरिया खताच्या आयातीसाठी (Urea Fertilizer Import) पतकर्जात (क्रेडिट लाइन) (Credit Line) ५५ दशलक्ष डॉलरची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक संकटाच्या (Economic Crisis) दरम्यान, श्रीलंका सरकारच्या तातडीच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून हे वाढवण्यात आली.

या संदर्भात श्रीलंका सरकार आणि भारताची निर्यात-आयात बँक यांच्यात गुरुवारी (ता. १०) कोलंबो येथे पतकर्ज करारावर स्वाक्षरी करण्यात आली. स्वाक्षरी वेळी श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, कृषिमंत्री महिंदा अमरावीरा यांच्या उपस्थितीत आणि श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले श्रीलंका आणि भारताचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते,’ असे भारतीय उच्चायुक्तांनी एका निवेदनात म्हटले आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी वेळेवर मदत केल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले.

या क्रेडिट लाइनमुळे श्रीलंका सरकारला सध्या सुरू असलेल्या भात पेरणीच्या ‘याला’ हंगामासाठी युरिया खताची आयात करण्यास मदत होईल. अत्यंत गरज लक्षात घेऊन, श्रीलंका सरकार आणि इएक्सआयएम बँकेने सर्व खरेदी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. जेणेकरून युरियाचा पुरवठा कमी वेळेत श्रीलंकेत पोहोचू शकेल.

भारतीय उच्चायुक्तांनी हे अधोरेखित केले की, क्रेडिट लाइनचे जलद अंतिमीकरण भारत सरकार श्रीलंकेच्या लोकांच्या कल्याणासाठी किती महत्त्व देते याची साक्ष देते. आपल्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणाच्या अनुषंगाने आणि श्रीलंकेचा एक प्रामाणिक मित्र आणि भागीदार या नात्याने, भारताने गेल्या काही महिन्यांत श्रीलंकेतील लोकांना बहुआयामी मदत केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com