Jeera Market : देशातील जिरा उत्पादन घटल्यानं दर तेजीत

यंदा जिरा पिकाला बदलते हवामान आणि अतिथंडीचा फटका बसत आहे. त्यामुळं यंदा देशातील जिरा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
Jeera Market News
Jeera Market NewsAgrowon

Jeera Market News: यंदा जिरा पिकाला बदलते हवामान आणि अतिथंडीचा फटका बसत आहे. त्यामुळं यंदा देशातील जिरा उत्पादन (Cumin Production) घटण्याचा अंदाज आहे.

त्यातच जिऱ्याला पुढील काळात निर्यातीसाठी आणि देशात लग्न सराईमुळं उठाव मिळेल. मागील हंगामातील साठाही कमी प्रमाणात शिल्लक आहे.

मग या स्थितीत जिऱ्याचे भाव (Jeera Rate) काय राहू शकतात? जिरा यंदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Jeera Market News
Chilli Market : देशातील लाल मिरचीचे उत्पादन यंदा घटले?

1. सोयाबीन काहीसे नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारात काल सायंकाळनंतर सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव तुटले होते. आजही दरात चढ-उतार सुरुच होते.

त्याचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारावरही जाणवला. आज अनेक बाजारांमध्ये सोयाबीन दरात क्विंटलमागं १०० रुपयांची नरमाई पाहाला मिळाली.

आज सोयाबीनचे सरासरी दर ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन दरवाढीची अपेक्षा असताना नरमाई आल्यानं शेतकरी काहीसे चिंतेत आहेत.

मात्र मुलभूत घटक बळकट असल्याने सोयाबीन दरवाढीसाठी येत्या काळात पोषक स्थिती असल्याचं जाणकार सांगत आहेत.

Jeera Market News
Soybean Market : देशातील सोयाबीनचे दर का नरमले? | Agrowon | ॲग्रोवन

2. कापूस दर कायम

आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारातही आता कापसाच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. देशातील शेतकरी कापसाचे दर वाढण्याची वाट बघत आहेत.

मात्र बाजारातील दर मागील काही दिवसांपासून प्रति क्विंटल ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत. जागतिक कापूस उत्पादन यंदा घटले.

देशातील उत्पादनही कमी झाले आहे. त्यामुळं कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे, असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं. 

3. हिरवी मिरची तेजीत

राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक कमी झाली. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी हिरव्या मिरचीची आवक २० क्विंटलपेक्षा कमीच आहे.

त्यामुळं सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

4. लिंबाला चांगला उठाव

सध्या लिंबाचे दर तेजीत आहेत. बाजारातील आवक कमी असल्यानं भाव वाढल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपासून लिंबाची आवक कमी झाली.

मात्र उठाव चांगला मिळतोय. थंडीमुळं मागणी काहीशी कमी झाली असली तरी बाजारात आलेल्या लिंबाला चांगला दर मिळतोय.

सध्या लिंबाला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार २०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. हा दर बाजारातील आवक वाढेपर्यंत कायम राहील, असा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

5. जगातील एकूण जिरा उत्पादनापैकी जवळपास ७० टक्के उत्पादन भारतात घेतलं जातं. त्यामुळं भारत हा जिऱ्याचा मुख्य निर्यातदारही आहे.

जिरा उत्पादनात देशात गुजरात आघाडीवर आहे. देशातील जिरा उत्पादनात एकट्या गुजरातचा वाटा जवळपास ६५ ते ७० टक्के आहे.

त्यानंतर राजस्थानचा नंबर लागतो. मागील हंगामात देशात जवळपास सव्वा सात लाख टन जिरा उत्पादन झालं होतं. सरासरीच्या तुलनेत उत्पादनात जवळपास १० टक्क्यांची घट राहिली.

तसंच चालू हंगामात गुजरातमध्ये लागवड कमी झाली. त्यातच बदलतं वातावरण आणि कडाक्याच्या थंडीचा गुजरात आणि राजस्थानमधील पिकावर परिणाम होत आहे.

त्यामुळं यंदा देशातील जिरा उत्पादन तब्बल ३३ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज काही जाणकार व्यक्त करत आहेत.

म्हणजेच यंदा उत्पादन सरासरीपेक्षा ४० टक्क्यांपेक्षा जास्त घटेल. त्यामुळं देशातील बाजारात जिऱ्याला सध्या चांगला दर मिळतोय.

उत्पादनघटीच्या अंदाजामुळे मागील महिनाभरात जिऱ्याचे दर जवळपास २४ टक्क्यांनी वाढले. सध्या जिऱ्याला सरासरी २८ हजार ते ३३ हजार रुपये क्विंटल दर मिळतोय.

चीनसह इतर देशांकडून पुढील काळात जिऱ्याला चांगली मागणी येऊ शकते.

तसंच देशातील लग्नसराईमुळं जिऱ्याला उठाव मिळेल. पुढच्या काही दिवसांत नवा जिरा बाजारात येईल.

मात्र मागणी चांगली असेल आणि पुरवठा कमी. त्यामुळं यंदा जिऱ्याचे दर वरच्या पातळीवर टिकून राहण्याचा अंदाज आहे.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com