भाजीपाल्याची दररोज दीड हजार क्विंटलची आवक

नगरला बटाटे, घेवड्याच्या दरात सुधारणा ः भुसारच्या आवकेत चढउतार
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दररोज साधारणपणे १४०० ते १५०० क्विंटलपर्यंत भाजीपाल्याची आवक होत झाली. भाजीपाल्यात बटाटे, घेवडा, टोमॅटो, फ्लॉवरच्या दरात सुधारणा दिसून आली. भुसारच्या आवकेतही चढउतार होता. दररोज भुसारची दीड ते दोन हजार क्विंटलची आवक होत होती.

नगर येथील बाजार समितीत गेल्या आठवड्यात भाजीपाल्यात टोमॅटोची १५० ते १६० क्विंटल आवक होऊन ८०० ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वांगीची ६८ ते ७५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते अडीच हजार रुपये, फ्लॉवरची ६८ ते ७० क्विंटलची आवक होऊन ४०० ते ३५००, कोबीची ५३ ते ६० क्‍विंटल आवक होऊन दोनशे ते १२०० रुपये, काकडीची ७५ ते ८० क्विंटल आवक होऊन ५०० ते १५००, गवारची १४ ते २० क्विंटल आवक होऊन १ हजार ते चार हजार, घोसाळ्याची नऊ क्‍विंटल आवक होऊन ५०० ते २५००, कारल्याची २४ ते ३० क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३०००, भेंडीची ५६ ते ६० क्विंटल आवक होऊन १००० ते २ हजार, घेवड्याची ७ ते १० क्विंटलची आवक होऊन सहा ते १० हजार, बटाट्याची पावणे चारशे क्विंटलपर्यंत आवक होऊन १७०० ते १९००, हिरव्या मिरचीची १०४ ते ११० क्विंटलपर्यंत आवक होऊन तीन हजार ते पाच हजार रुपये, शेवग्याची २५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १००० ते तीन हजार रुपये, सिमला मिरचीची ६५ सेंटर पर्यंत फोन दोन हजार ते तीन हजार रूपयापर्यतचा दर मिळाला आहे. आंब्याची आवक वाढली आहे. हापूस आंब्याची दररोज २० क्विंटलपर्यंत आवक होत असून ५ हजार ते दहा रुपये क्विंटलचा दर मिळाला. केशर आंब्याची ३० क्विंटलची आवक होऊन ७००० ते १३ हजार रुपये, बदाम आंब्याचे २८ क्विंटल आवक होऊन चार हजार ते सहा, लालबाग आंब्याची ११ क्विंटल आवक होऊन चार हजार ते पाच हजार रुपयांचा दर मिळाला.

भुसारची दोन हजार क्विंटलची आवक

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसारमालाची दर दिवसाला २ हजार क्विटंलपर्यत आवक होत आहे. त्यात सर्वाधिक ज्वारीची २०३ क्विंटल, बाजरीची ६२, हरभऱ्याची १०८ क्विंटल, गव्हाची २११, चिंचेची ६६४, सोयीबीनची १४ क्विंटलची आवक होत आहे. ज्वारी, बाजरीच्या दरात चढउतार होत असून गहू, हरभरा, मुग, उडीद, सोयाबीनचे दर स्थिर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com