आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांच्या दरात घट

किमती कमी करण्याचा कंपन्यांचा निर्णय
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांच्या दरात घट
Edible OilAgrowon

नवी दिल्ली ः विविध खाद्यतेल कंपन्यांनी (Edible Oil Company) खाद्यतेलाच्या दरात मोठी (Edible Oil Price) घट करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यफूल (Sunflower Oil), सोयाबीन (Soybean Oil), मोहरी आणि पाम तेल (Palm Oil), सर्वांच्याच थेट विक्री किमतीमध्ये ही घट होणार आहे. ५ रुपये ते १५ रुपयांपर्यंत ही घट असणार आहे. यामुळे महागाईने त्रासलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळणार आहे.

‘धारा’ या नावाने खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या मदर डेअरी कंपनीने मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे दर जवळपास १५ रुपयांपर्यंत कमी केले आहेत. थेट विक्री किमतीत ही घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरात घट आणि स्थानिक पातळीवरील खाद्य तेलाची मुबलक उपलब्धता यामुळे हे दर कमी झाले आहे. पामतेलाच्या किमतीतही प्रतिलिटर साधारण ७ ते ८ रुपयांची घट झाली आहे. तर सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या दरात प्रतिलिटर १० ते १५ रुपयांची घट झाली आहे. तर सोयाबीन तेलाची किंमत प्रतिलिटर ५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

फॉर्च्युन कंपनीच्या तेलातही लवकरच घट होणार आहे. तर जेमिनी तेलाच्या किमतीतही १५ रुपयांची घट झाली आहे. आणखी २० रुपये कमी होण्याची शक्यताही आहे. सूर्यफूल तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्याने तेलाची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कही कमी केले आहे. त्यामुळे तेलाच्या दरात घट झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com