Chana Procurement : चुकाऱ्यांना विलंब, शेतकऱ्यांमध्ये रोष

खरीप हंगामास सुरुवात झाली असताना रब्बी हंगामातील हरभरा चुकारे देण्यात मात्र विलंब होऊ लागल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या खरेदीत महाएफपीसीला नवीन लक्ष्यांक देण्यात आले नव्हते.
Chana
Chana Agrowon

अमरावती : नाफेडने (NAFED) दिलेले नवीन लक्ष्यांक पूर्ण करीत जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने हरभरा खरेदी (Chana Procurement) बंद केली आहे. महाएफपीसीसह तीन यंत्रणांनी नवीन लक्ष्यांकासह ७ लाख २८ हजार क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. खरीप हंगामास (Kharif Season) सुरुवात झाली असताना रब्बी हंगामातील हरभरा चुकारे (Delay In Chana Payment) देण्यात मात्र विलंब होऊ लागल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या खरेदीत महाएफपीसीला नवीन लक्ष्यांक देण्यात आले नव्हते. (Chana Procurement In Maharashtra)

Chana
कापूस, हरभरा, सोयाबीनच्या भावात नरमाई

नाफेडमार्फत आतापर्यंत तीन वेळा हरभरा खरेदी करण्यात आला आहे. तिसऱ्या वेळी एफसीआयचे शिल्लक लक्ष्यांक स्वतःकडे वळवून घेत खरेदी करण्यात आली. त्यावेळी नोंदणीकृत शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करायचा शिल्लक होता. त्यामुळे रोष निर्माण झाल्याने लक्ष्यांक वाढवून घेत हरभरा खरेदी करण्यात आला. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १७ हजार तर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनला आठ हजार क्विंटलचे लक्ष्यांक वाढवून देण्यात आले होते. जुन्या व प्रलंबित लॉट एन्ट्रीसह मिळालेले लक्ष्यांक दोन्ही यंत्रणांनी १८ जूनलाच पूर्ण करीत खरेदी बंद केली आहे.

Chana
सत्तेच्या गोंधळात हरभरा खरेदीचा प्रश्‍न रखडला

जिल्हा मार्केटिंगने त्यांच्या नऊ केंद्रांवरून १५ हजार ४२५ शेतकऱ्यांचा २ लाख ६७ हजार ४३९ क्विंटल तर, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने १५ हजार १३५ शेतकऱ्यांचा २ लाख ६० हजार ८९४ क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. रब्बी हंगामातील एकूण ५ लाख २८ हजार ३३३ क्विंटलची खरेदी या दोन यंत्रणांनी केली असून एमएफपीसीला खरेदीसाठी नवीन लक्ष्यांक देण्यात आले नव्हते. महाएफपीसीच्या २६ केंद्रांवर १०,९८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ७३५९ शेतकऱ्यांचा २ लाख १३२८ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. उर्वरित हरभरा व प्रलंबित लॉट एन्ट्रीसाठी परवानगी मागण्यात आली होती.

चुकाऱ्यांना होतोय विलंब

जिल्ह्यात नाफेडेने तीन यंत्रणांच्या माध्यमातून सव्वासात लाख क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. १८ जूनपर्यंत चाललेल्या खरेदीतील चणा गोदामात पोहोचला असला तरी त्याची पावती अद्याप नाफेडपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे विक्री केलेल्या हरभऱ्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. खरीप हंगामास सुरुवात झाली असताना पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने चणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com