बाजारात कलिंगडाची मागणी आणि दर वधारले

उन्हाचा तडाखा वाढल्याने गारेगार कलिंगडांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी कलिंगडाच्या दरात किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
Watermelon Rate
Watermelon Rate Agrowon

नागपूर - उन्हाचा तडाखा वाढल्याने गारेगार कलिंगडांच्या मागणीत वाढ (Increase Watermelon Demand) झाली आहे. परिणामी कलिंगडाच्या दरात (Watermelon Rate) किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो कलिंगडाची विक्री २० ते ३० रुपये दराने केली जात आहे.

Watermelon Rate
विविधरंगी कलिंगड, खरबूज थेट विक्रीतून नफा वाढवण्याचे कसब

महात्मा फुले मार्केट (Mahatma Phule Market ) व कळमना बाजार समिती मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात रोज साधारणपणे १००० क्विंटल कलिंगडांची आवक (Watermelon Arrival) होत आहे. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमधून या दोन्ही बाजारपेठांमध्ये कलिंगड विक्रीस पाठविण्यात येत आहेत. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातून सर्वाधिक आवक होत असल्याचे सांगण्यात आले. यंदा कलिंगडांची आवक वाढली आहे. येत्या काही दिवसांत कलिंगडांची आवक आणखी वाढेल, असे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कलिंगडांचा हंगाम सुरू होतो. उन्हाच्या तडाख्यामुळे ज्युस सेंटर चालक, उपाहारगृहचालक तसेच फळ विक्रेत्यांकडून कलिंगडांच्या मागणीत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

१००० क्विंटलपर्यंत उच्चांकी आवक

उन्हाच्या तडाख्यामुळे कलिंगडांना मागणी वाढली असून एप्रिल महिन्यात कलिंगडांची उच्चांकी आवक होते. साधारणपणे १००० क्विंटलपर्यंत कलिंगडांची आवक एप्रिल महिन्यात होते. मुस्लिम धर्मीय रमजान महिन्यात उपवास करतात. उपवासामुळे कलिंगडांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे शेतकऱ्यांनी कलिंगडांची लागवड कमी केली होती. यंदा कलिंगडांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. लागवड केल्यानंतर ६५ दिवसांत फळ तयार होते. यंदा कलिंगडांना मागणी तसेच दरही चांगले मिळत असून कलिंगडांचा हंगाम जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com