हरभरा खरेदी पूर्ववत करण्याची मागणी

धोत्रे, सावरकर यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन
हरभरा खरेदी पूर्ववत करण्याची मागणी
Chana Agrowon

अकोला ः नाफेडकडून (NAFED) बंद करण्यात आलेल्या हरभरा खरेदीला (Chana Procurement) मुदतवाढ देऊन खरेदी सुरु करण्यासाठी पोर्टल त्वरित सुरु करावे, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर (NarendraSingh Tomar), राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी पत्राद्वारे केली. याची फडणवीस यांनी दखल घेऊन तोमर यांच्याशी चर्चा केली. तसेच शेतकऱ्यांना ताबडतोब न्याय देण्याची मागणी केली. तोमर यांनी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती जिल्हा भाजपकडून देण्यात आली.

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. या वर्षी हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे. केंद्र शासनाच्या हमी भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा सुद्धा झाला. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत आर्थिक नुकसान होणार नाही, या साठी नाफेडकडून बंद करण्यात आलेल्या हरभरा खरेदीला मुदतवाढ द्यावी, पोर्टल त्वरित सुरु करावे, अशी मागणी तोमर यांच्याकडे केली आहे.

खरीप हंगाम जवळ असल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकल्याशिवाय आर्थिक नियोजन करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हरभरा विक्री शिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. नाफेडकडून खरेदी प्रक्रिया बंद झाल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने खुल्या बाजारात आपला माल विकावा लागेल. परंतु खासगी बाजारात हमीभावापेक्षा ८०० ते १००० रुपये कमी दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com