तुरीच्या आयातीमध्ये दुप्पट वाढ

देशात तूर, मूग आणि उडीद या पिकांच्या आयातीमध्ये वाढ झाली आहे. २०२० मध्ये तुरीची आयात ४.४२ लाख टन होती. मात्र २०२१-२२ मध्ये आयतीत वाढ होऊन तूर आयात ८.४० लाख टनावर पोहचली आहे.
तुरीच्या आयातीमध्ये दुप्पट वाढ
Tur ImportAgrowon

देशात तूर, मूग आणि उडीद या पिकांच्या आयातीमध्ये वाढ झाली आहे. २०२० मध्ये तुरीची आयात ४.४२ लाख टन होती. मात्र २०२१-२२ मध्ये आयतीत वाढ होऊन तूर आयात ८.४० लाख टनावर पोहचली आहे. म्हणजे जवळपास दुपट्टीने आयात वाढ झाली आहे. तसेच मूग आणि उडीद यांच्या आयातीत वाढ झाली आहे. २०२१ मध्ये उडीदाची आयात ३.४४ लाख टन होती. उडीदाच्या आयात वाढून ६.११ लाख टन झाली आहे. तर मूग आयात ०.८१ लाख टनावरून १.९५ लाख टनावर पोहचली आहे.

केंद्र सरकारने कडधान्य आयातीचं खुलं धोरण स्वीकारल्यामुळे कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. कारण खुल्या बाजारात कडधान्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्याकडे पाठ फिरवली आहे. कडधान्याऐवजी ऊस, कापूस, मका, सोयाबीन या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मॉन्सून सक्रिय झाल्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रमध्ये तूर आणि उडीद लागवडीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील अनेक बाजारामध्ये तुरीला ५७०० ते ६१०० दरम्यान दर मिळत आहेत. मात्र हा दर हमीभावपेक्षा कमी आहे.

तेलाबरोबरच कडधान्य आयतीसाठी सरकारने पायघड्या पसरलेल्या आहेत. त्यामुळे २०२२ या आर्थिक वर्षात कडधान्य आयतीत ९.४४ टक्क्यांनी वाढ झाली. २०२०-२१ मध्ये कडधान्य आयात २४.६६ लाख टनावर होती. २०२१-२२ मध्ये ९ टक्क्यांनी वाढ होऊन कडधान्य आयात २६.९९ लाख टनावर पोहचली आहे. त्यामुळे चालू वर्षातही कडधान्य आयात २५-२६ लाख टनाच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

डिजीसीआयएसच्या माहितीनुसार, २०२१-२२ मध्ये कडधान्य आयातीसाठी सरकारने १६६२७ कोटी रक्कम खर्च केली आहे. जी मागील वर्षी ११९३७ कोटी इतकी होती. यंदा सरकारने १०.५५ दशलक्ष टन कडधान्य उत्पादनाचं उद्दिष्ट्य ठेवलं आहे. त्यासाठी सरकारने खरीप पिकांसाठीच्या हमीभावात वाढ केल्याचा दावाही केला आहे. मात्र खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत. आयग्रेनचे इंडियाचे राहुल चौहान म्हणाले, "यंदाही कडधान्य आयात कायम राहण्याची शक्यता आहे. मसूर सारख्या पिकांची आयात कॅनडातील हंगामावर अवलंबून असेल. डॉलरमधील वाढीमुळे आयातीवर परिणाम होतील."

दरम्यान, केंद्र सरकारने चालू खरीप हंगामासाठी तूर आणि उडीदासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये अशी हमीभावामध्ये वाढ केली आहे. त्यानुसार तूर आणि उडीदासाठी ६६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तर मुगासाठी प्रति क्विंटल ७७५५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र खुल्या बाजारात कडधान्याचे दर हमीभावाच्याही खाली असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com