Soya Oil Import : सोयाबीन तेल आयातीवर शुल्क लागू होणार

केंद्र सरकारचा निर्णयः सोयाबीनला फायदे होणार
Soya oil
Soya oilAgrowon

पुणे : केंद्राने दोन वर्षांसाठी २० लाख टन शुल्कमुक्त आयातीला मागील वर्षी परवानगी दिली होती.

पण आता पुढील आर्थिक वर्षापासून शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच १ एप्रिलपासून कच्चे सोयाबीन तेल (Row Soybean Oil) आयातीवर शुल्क लागू होणार आहे.

यामुळं सोयातेलाचे दर (Soya Oil Rate) काहीसे वाढून सोयाबीनलाही आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील (Soybean Market) अभ्यासकांनी व्यक्त केला.

मागील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर तेजीत होते. त्यामुळं देशातही खाद्यतेलाचे (Edible Oil) दर वाढले होते.

पण वाढत्या महागाईचं कारण देत, भारत सरकारनं २४ मे २०२२ रोजी सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावरील शुल्क काढण्याचा निर्णय घेतला.

दोन वर्षे प्रत्येकी २० लाख टन कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफुल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली.

म्हणजेच  २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन वर्षात सोयाबीन तेलाची ४० लाख टन आणि सूर्यफुल तेलाची ४० लाख टन आयात होणार होती.

Soya oil
Soybean Oil Import : सोयाबीन तेल आयात आठ टक्क्यांनी वाढली

पण आता आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले. पामतेल ३० टक्क्यांनी स्वस्त झाले. तर सोयाबीन तेल १० टक्के आणि सूर्यफुल तेल ७ टक्क्यांनी नरमले.

त्यामुळं सरकारनं १ एप्रिल २०२३ पासून कच्च्या सोयाबीन तेलाची शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द केला.

म्हणजेच कच्चे सोयाबीन तेल आयातीवर शुल्क लागेल. पण सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयात पुढील वर्षातही सुरुच राहील.

मागील वर्षभर सोयाबीन तेल आयातीवर शुल्क नव्हते. त्यामुळं सोयातेल स्वस्त होते. त्याचा परिणाम सोयाबीन दरावरही होत होता.

तसंच पामतेलावर आयातशुल्क लागू होते. त्यामुळं पामतेलाच्या दरावरही परिणाम होत होता. पण आता पामतेलाला उठाव मिळू शकतो, असा अंदाज खाद्यतेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Soya oil
Edible Oil : खाद्यतेल आयातीवर शुल्क लावा; सोपाची मागणी

स्वस्त आयात थांबेल?


देशातील बाजारात सोयाबीनचे दर मागील दीड महिन्यांपासून नरमले आहेत. केंद्र सरकारनं सोयाबीन तेलावरील आयात शुल्क काढले.

सोयातेलाची स्वस्त आयात होत होती. त्यामुळं देशातील सोयातेलही दबावात राहून दर वाढत नाहीत, असं काही अभ्यासक सांगत होते.

पण आता केंद्रानं सोयाबीन तेलावरील शुल्क एप्रिल महिन्यापासून लागू केले. त्याचा फायदा देशातील सोयाबीनला मिळू शकतो.

सोयाबीनला आधार मिळणार


आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढले. सोयापेंडचा भावही तेजीत आहे. मात्र खाद्यतेलाचे दर कमी आहेत.

पण भारत सरकारनं आयातशुल्क लागू केल्यानं सोयातेलाचे दर सुधारु शकतात.

त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा फायदा देशातील शेतकऱ्यांना मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com