फणस आणि हिरव्या मिरचीची धुब्री ते दुबई निर्यात

धुब्री जिल्ह्यातील अनेक उत्पादने निर्यातक्षम दर्जाची आहेत.
Green  Chili Export
Green Chili ExportAgrowon

धुब्री, आसाम : आसाममधून दुबईला (Dubai) फणस आणि हिरवी मिरचीची निर्यात (Green chili Export) सुरू करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. बिलासिपारा शहरात लोकप्रियो गोपिनाथ बोरडोलोई विमानतळावरून ही पहिली खेप उपजिल्हाधिकारी एम. पी. अन्बमुथन (Deputy Cm M. P. Anbmuthan) यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना करण्यात आली. तेथून पुढे ती दुबईला पाठविण्यात येणार आहे.

धुब्री जिल्ह्यातील अनेक उत्पादने निर्यातक्षम (Production Export) दर्जाची आहेत. ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच एपीईडीएकडून (APEDA) गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून फणस व मिरची उत्पादक शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी प्रथम लुलू आंतरराष्ट्रीय समूहाच्या प्रतिनिधींची भेट घेतली आणि त्यानंतर फणस आणि हिरव्या मिरचीच्या निर्यातीची (Greens Chili Export) संधी उपलब्ध झाली, असे अन्बमुथन म्हणाले. एपीईडीए (APEDA) यांच्याकडून या सर्व प्रक्रियेचे नियोजन करण्यात येणार असून, त्यांच्याकडून त्यासाठी आवश्‍यक तांत्रिक साह्य करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आठवडा तत्त्वावर निर्यात
दीड टन फणस आणि अर्धा टन हिवरी मिरची असलेली पहिली खेप निर्यात करण्यात आली आहे. लुलू आंतरराष्ट्रीय समूहाच्या वतीने गल्फ देशांमधील त्यांच्या २०० साखळी बाजारपेठांच्या माध्यमातून फणस आणि हिरवी मिरचीचे वितरण करण्यात येणार आहे. हिरवी मिरची उत्पादक संघटनेच्या सहकारी सोसायटीच्या बिलासपारा आणि नायर अल्गा विकास क्षेत्रातील ५६० भागधारक शेतकरी या उत्पादनांची आठवडा तत्त्वावर निर्यात करतात.

धुब्री जिल्ह्याबरोबरच संपूर्ण आसाम राज्याच्या कृषी-आर्थिक क्षेत्रासाठी हा दिवस खास आहे. जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे धुब्रीचा फणस आणि मिरची दुबईला पाठवणे शक्य झाले आहे.

एम. बी. अन्बमुथन, उपजिल्हाधिकारी, धुब्री जिल्हा

फणस आणि मिरचीला ग्राहकांकडून मागणी राहिल्यास धुब्रीमधून निर्यात सुरू ठेवता येईल.

रवी कुमार, महाव्यवस्थापक, लुलू आंतरराष्ट्रीय समूह

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com