राजस्थानमध्ये हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ

केंद्र सरकारने राजस्थानामधील हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून दरदिवशी हरभरा खरेदीची मर्यादा २५ क्विंटलवरुन ४० क्विंटलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानमध्ये हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ
Chana ProcurementAgrowon

केंद्र सरकारने राजस्थानामधील हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून दरदिवशी हरभरा खरेदीची मर्यादा (Procurement Limit) २५ क्विंटलवरुन ४० क्विंटलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आणि वेगवेगळ्या संघटनांनी केंद्र सरकारला निवेदन दिली होती. त्यानंतर ३० जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

२ जून रोजी राजस्थानमधील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासंबंधी (Chana Procurement Target) कृषी मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार, ५.९८ लाख टनाऐवजी ६.२० लाख टन हरभरा खरेदीचे उद्दिष्टय ठरवण्यात आले. हे खरेदीचे उद्दिष्टय राजस्थानमधील एकूण हरभरा उत्पादनाच्या अंदाजे २५ टक्के आहे.

“आम्ही केंद्र सरकारला हरभरा खरेदीसाठीची मुदतवाढ देण्यासाठी एप्रिलमध्ये विनंती केली होती. मात्र केंद्रानं खरेदीसाठीची मुदतवाढीसाठीचा निर्णय घ्यायला उशीर केला आहे. शेतकऱ्यांना हमीभावाने विक्री करता यावी यासाठी केंद्राने मुदतवाढ दिली पाहिजे.” अशी मागणी किसान महापंचायतची अध्यक्ष रामपाल जाट यांनी केली आहे.

३१ मे पर्यंत राजस्थानमधील ५५००० हून अधिक शेतकऱ्यांकडून १.२० लाख टन हरभरा ५२३० प्रति क्विंटल वर खरेदी करण्यात आला. हरभऱ्याचे सरासरी बाजारभाव एप्रिलमध्ये ४७१८ तर मेमध्ये ४४१७ रुपयेत प्रति क्विंटल होते. दरम्यान राजस्थान सरकारने केंद्राला कळवले आहे की, “जर खरेदीचे उद्दिष्ट उत्पादनाच्या ४० टक्क्यांपर्यंत वाढवायचे असेल तर हरभराचे वितरण सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये स्वखर्चाने करावे लागेल.”

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com