Vegetable : फळभाज्यांच्या आवक व दरात चढ-उतार

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ४ ते ९ जुलै दरम्यान कारलीची १३० क्विंटल आवक झाली. १६ ते ४२ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या कारल्याला सरासरी १००० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.
Vegetable
VegetableAgrowon

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात कारली (Bitter Gourd), कोबी, ढोबळी मिरची (Capsicum), फ्लॉवर, हिरवी मिरची, भेंडी (Lady Finger), आदी फळभाज्यांच्या (Vegetables) व लिंबूच्या आवक व दरात चढउतार पाहायला मिळाला. जांभुळाची आवक कमीच राहिली तर आल्याचे दर प्रतिक्विंटल सरासरी तीन हजाराच्या आतच राहिले.

Vegetable
पेट्रोल, डिझेलनंतर घरगुती गॅस ५० रुपयांनी महागला

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ४ ते ९ जुलै दरम्यान कारलीची १३० क्विंटल आवक झाली. १६ ते ४२ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या कारल्याला सरासरी १००० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. कोबीची एकूण आवक २५७ क्विंटल झाली. ३१ ते ६७ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या कोबीला सरासरी ११०० ते १५५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची एकूण १४६ क्विंटल आवक झाली. १४ ते ४३ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला सरासरी १५५० ते २२५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. फ्लॉवरची एकूण आवक २४७ क्विंटल झाली. ३३ ते ७२ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या फ्लॉवरला सरासरी ११०० ते २२५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक ३४९ क्विंटल झाली. ५८ ते ११४ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी २५५० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. भेंडीची एकूण आवक १०४ क्विंटल झाली. १७ ते ३१ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या भेंडीला २८५० ते ३७५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. लिंबूची एकूण आवक ७७ क्विंटल झाली. १३ ते २० क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या लिंबूचे सरासरी दर २००० ते ३२५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

अपवाद वगळता आल्याची आवक कमीच

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात ७ जुलै रोजी २४७ क्विंटल आवक झालेल्या आल्याचा अपवाद वगळता इतर दिवशी आल्याची आवक कमीच झाली. आठवडाभरात चार वेळा मिळून ३०१ क्विंटल आवक झालेल्या आल्याचे सरासरी दर २२५० ते २८५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com