Soybean : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धत

कसमादे भागात बीबीएफ व टोकण पद्धतीने लागवडीला पसंती
Soybean Production
Soybean ProductionAgrowon

नाशिक : जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा (Soybean Sowing) गेल्या तीन वर्षांत वाढत आहे; मात्र बियाणे (Soybean Seed), खतांचा वाढलेला खर्च (Fertilizer Cost) शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे सुधारित पीक लागवड पद्धतीचा अवलंब करून उत्पादनवाढीसाठी (Soybean Production) शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने कसमादे भागातील काही प्रयोगशील शेतकरी बीबीएफ व टोकण पद्धतीने लागवडी करत आहेत. त्याचे फायदेही शेतकऱ्यांना झाले आहेत.

Soybean Production
सोयाबीन, तूर पिकासाठी सुधारित पेरणी पद्धती काय आहे?

जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर सरासरी सोयाबीन क्षेत्र आहे. त्यामध्ये प्रामुख्याने निफाड, सिन्नर यासह येवला चांदवड तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. मात्र मागील वर्षी कळवण तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १८३ टक्के पेरण्या झाल्या होत्या. एकूण क्षेत्र ९ हजार २४७ हेक्टर झाले होते. येथील शेतकरी इतर पिकांप्रमाणे व्यावसायिक पद्धतीने बदल स्वीकारत आहेत. उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झाल्याचे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढ करण्याचे प्रयत्न शेतकरी करत आहेत.

Soybean Production
Soybean Sowing : देशातील अपारंपरिक क्षेत्रात सोयाबीन लागवड विस्तारणार

मागील वर्षी तंत्रज्ञानाच्या विस्तारानंतर काही शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्राने उत्पादनवाढ साधली. चालू वर्षी याच शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा काही बदल स्वीकारून टोकण पद्धतीने लागवडीचा निर्णय घेतला आहे. कळवण तालुक्यात होणारी लागवड यापूर्वी फोकून दिल्यानंतर बेल्हे घालून केली जायची. किंवा नांगरीमागे बियाणे टाकून लागवडीची पारंपरिक पद्धत होती.

शास्त्रीय पद्धतीचा अवलंब :

- सोयाबीन पिकच्या सुधारित ‘फुले संगम’वाणाचा लागवडीसाठी वापर

- पेरणीपूर्व बीजप्रक्रिया थायरम, रायझोबियम, पीएसबीचा वापर

- सरी वरंबा टोकण पद्धतीने लागवड

- बियाणे बचत व मर्यादित झाडांची संख्या

टोकण पद्धतीने लागवडीसाठी २ फुटी सरी पाडून वरील माथ्यावर ६ इंचवर २ बिया टोकून लागवड केली जात आहे. जसे मिरची, कांदा पिकात नियोजन करून उत्पादनाचे प्रयोग यशस्वी होतात. तसे जिरायती पिकांत सुधारित पद्धती नव्हत्या. आता बदल केल्यानंतर त्या फायदेशीर असल्याचा मागील वर्षापासून अनुभव आहे. मागील वर्षी एकरी १४ क्विंटल उत्पादन हाती आले. आता त्यात अजून वाढ होइल अशी खात्री वाटते.
पंडीत वाघ, शेतकरी, बार्डे, ता. कळवण.
सुधारित बियाणे, बीजप्रक्रिया, एकात्मिक खत व कीडरोग व्यवस्थापनाचा या भागात अभाव होता. आता काही प्रयोगशील शेतकरी बदल करत आहेत. कळवणचा अधिक भाग अधिक पर्जन्याचा असल्याने पाणी साचून निचरा न झाल्याने पिके खराब होण्याचा व कीड रोगांचा धोका होता. आता बीबीएफ व टोकण पद्धतीने सोयाबीन लागवडी केल्यास यावर मात करता येते.
रूपेश खेडकर, विषय विशेषज्ञ, कृषीविद्या-कृषी विज्ञान केंद्र, वडेल, ता. मालेगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com