सोलापुरात डाळिंबाच्या दरात पुन्हा सुधारणा

आवक मात्र जेमतेमच; लिंबूचे दरही टिकून
Separate cell for pomegranate in Agriculture Department at Solapur
Separate cell for pomegranate in Agriculture Department at Solapur

सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा झाली. आवक आणि मागणीतील तुटीमुळे डाळिंबाचे दरात वाढ होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक रोज पाचशे ते सातशे क्विंटल एवढीच राहिली. डाळिंबाची आवक प्रामुख्याने सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ या स्थानिक भागातूनच राहिली. बाहेरील आवक अगदीच नगण्य राहिली. पण डाळिंबाची कमी होत असलेली आवक आणि वाढत असलेली मागणी यामुळे तूट निर्माण होत आहे. परिणामी, डाळिंबाच्या दरात चांगलीच सुधारणा होते आहे. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक १३००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय लिंबूची आवकही अशीच कमी राहिली. रोज १० ते १५ क्विंटलपर्यंत आवक राहिली. पण मागणी असल्याने दर मात्र टिकून राहिले. लिंबूला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ६००० रुपये आणि सर्वाधिक ९००० रुपये असा दर मिळाला. खरबूज आणि पपईलाही बऱ्यापैकी उठाव मिळाला. त्यांचे दर मात्र काहीसे स्थिरच राहिले. खरबुजाची साधारण रोज १०० ते २०० क्विंटल आवक राहिली. तर पपईची २ ते ५ क्विंटल आवक राहिली. खरबूजाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये, तर पपईला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला.

कांद्याला उठाव, दर स्थिर

या सप्ताहात कांद्याला मात्र चांगला उठाव मिळाला असला, तरी दर मात्र काहीसे स्थिर राहिले. कांद्याची आवक स्थानिक भागातूनच रोज ६० ते ८० गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक ११०० रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com