सोलापुरात कोथिंबीर, हिरवी मिरचीचे दर पुन्हा वधारलेलेच

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची आवक तुलनेने कमीच राहिली.
सोलापुरात कोथिंबीर, हिरवी मिरचीचे दर पुन्हा वधारलेलेच
Vegetable MarketAgrowon

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर (Coriander Arrival) आणि हिरवी मिरचीची (green Chili Arrival) आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने त्यांचे दर (Vegetable Price) वधारलेले राहिल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबिरीची आवक प्रतिदिन १० ते १५ हजार पेंढ्या तर हिरव्या मिरचीची आवक प्रतिदिन ५० ते १०० क्विंटलपर्यंत राहिली. परंतु मागणीच्या प्रमाणात आवक नसल्याने तूट निर्माण होत असल्याने या सप्ताहातही त्यांचे दर वधारलेलेच राहिले. गेल्या दोन-अडीच महिन्यांहून अधिक काळ कोथिंबीर, मिरचीला चांगला उठाव मिळतो आहे. त्यांच्या दरातील किंचित चढ-उतार वगळता दर मात्र टिकून आहेत. या सप्ताहात कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ८०० ते १००० रुपये आणि हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला.

त्याशिवाय सिमला मिरची, कारली, वांगी यांचे दरही काहीसे स्थिर राहिले. त्यांनाही मागणी राहिली. सिमला मिरचीची रोज १० ते १५ क्विंटल, कारल्याची पाच ते १० क्विंटल आणि वांग्याची २० ते ४० क्विंटल अशी आवक राहिली. सिमला मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, कारल्याला २००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये तर वांग्याला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. मेथी, शेपूची आवकही तुलनेने कमीच राहिली. पण त्यांचे दरही चांगले राहिले. तसेच मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ८०० रुपये, शेपूला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.

डाळिंबाचे दर स्थिर

डाळिंबाची आवक गेल्या दोन आठवड्यापासून सातत्याने स्थिर आहे. पण मागणी असल्याने दरातही फारशी चढ-उतार राहिली नाही. डाळिंबाची रोज एक ते सव्वाटनापर्यंत आवक आहे. डाळिंबाची आवक प्रामुख्याने सांगोला, मंगळवेढा, माढा, पंढरपूर या स्थानिक भागातूनच आहे. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ५५०० रुपये आणि सर्वाधिक १३००० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com