नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याच्या आवकेत वाढ; दर टिकून
Summer OnionAgrowon

नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याच्या आवकेत वाढ; दर टिकून

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतसप्ताहामध्ये कांदा बाजार आवारात कांद्याची आवक २४,३५६ क्विंटल झाली.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतसप्ताहामध्ये कांदा बाजार (Onion Market) आवारात कांद्याची आवक (Onion Arrival) २४,३५६ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल ४५० ते १,५०० तर सरासरी दर १,१५० रुपये राहिला.यापूर्वीच्या सप्ताहात आवक २१,७५४ क्विंटल झाली होती. त्यावेळीही प्रतिक्विंटल सरासरी दर १,१५० रुपये राहिला होता.

Summer Onion
राज्यातील ‘नाफेड’च्या कांदा खरेदीत गौडबंगाल

बटाट्याची आवक (Potato Arrival) ७१९१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १,९०० तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला. लसणाची आवक (Garlic Arrival) ६५३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ९,५०० तर सरासरी दर ७,५०० रुपये राहिला. आद्रकची आवक ४१० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,५०० तर सरासरी दर २,००० रुपये राहिला. फळभाज्यांच्या आवकेनुसार दरात चढ उतार दिसून आली. वालपापडी-घेवड्याची आवक २,२३७ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ५,००० ते ५,६०० असा तर सरासरी दर ५,४०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ५,००० ते ७,००० तर सरासरी दर ६,५०० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक २,४१८ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,८०० ते ३,५०० तर सरासरी दर ३,२०० रुपये राहिला. गाजराची आवक ३,२०९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते ३,३०० तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला.

Summer Onion
राहुरी कृषी विद्यापीठाने ऑनलाईन विकले चार टन कांदा बियाणे

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ६० ते ९५० तर सरासरी ७००, वांगी १५० ते ४२७ तर सरासरी ३०० व फ्लॉवर १०० ते २४०सरासरी १६० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ९० ते १८० तर सरासरी१४० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३५० ते ५६० तर सरासरी दर ४३५ रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते २८० तर सरासरी १७०, कारले ३५० ते ६०० तर सरासरी ४५०, गिलके ३५० ते ४८० तर सरासरी ३५० व दोडका ५०० ते ८०० तर सरासरी दर ७०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले.

केळीची आवक १,२७४ क्विंटल झाली.तिला प्रतिक्विंटल ८५० ते १,५०० तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला.डाळिंबाची आवक ७१९ क्विंटल झाली. त्यास ९०० तर १२,५०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ९,००० रुपये राहिला. आंब्याची आवक ६,५९३ क्विंटल झाली. केशर ८,००० ते १३,०००,सरासरी ११,०००,बदाम २,५०० ते ५,००० सरासरी ४,००० व लालबागला २,५०० ते ५,००० तर सरासरी ४,००० असे प्रतिक्विंटलला दर मिळाले.

भाजीपाला प्रति १०० जुड्यांचा दर

पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी

गावठी कोथिंबीर...१,२००...२,८००...२,३००

हायब्रीड कोथिंबीर...१,०००...३,०००...२,०००

मेथी...२,०००...४,०००...३,२००

शेपू...९००...२,२००...१,८००

कांदापात...१,५००...४,१००...३,०००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com