नगरला टोमॅटो, बटाट्याच्या आवकेत वाढ

नगर येथील बाजार समितीत मागील आठवड्यात टोमॅटोची दर दिवसाला २४० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.
Vegetable
VegetableAgrowon

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nagar APMC) मागील आठवड्यात टोमॅटो, बटाट्याची आवक (Tomato Potato Arrival) वाढली होती. दर दिवसाला भाजीपाल्याची (Vegetable) साधारणपणे दोन हजार शंभर क्विंटलची आवक झाली. दर स्थीर होते. शिवाय फळांची (Fruit Arrival) रोज तीनशे क्विंटलची आवक झाली, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर येथील बाजार समितीत मागील आठवड्यात टोमॅटोची दर दिवसाला २४० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. बटाट्याची दररोज ५३० क्विंटलपर्यंत आवक होऊन दीड हजार ते २ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळाला. वांग्यांची ८० क्विंटलपर्यंत आवक होउन ४०० ते २ हजार, काकडीची ८० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते १९०० रुपयांचा दर मिळाला. फ्लॉवरची ९९ क्विटंलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार ३००, कोबीची ११० क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ३ हजार ५००, गवारची ११ ते १५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ६ हजार ५००, घोसाळ्याची १० ते १५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार ५००, दोडक्याची १७ ते २० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार ५००, कारल्याची २८ ते ३० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५००, भेंडीचा ६० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ५ हजार, हिरव्या मिरचीची १२० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ५ हजार, शेवग्याची ३३ क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते ६ हजार, शिमला मिरचीची ४५ ते ५० क्विंटलची आवक होउन २ हजार ते ४ हजार, ओल्या भुईमूग शेंगाची ७६ ते ८० क्विंटलपर्यंत आवक होत असून २५०० ते ३ हजार ७०० रुपयांचा दर मिळाला आहे. शेपू, पालक, मेथी, करडी भाजीला मागणी होती आणि दरही चांगला मिळाला.

कैरीची शंभर क्विंटलपर्यंत आवक

हिरव्या कैऱ्याला या काळात चांगली मागणी असतो. त्यामुळे नगरला बाजार समितीत सध्या शंभर क्विंटलपर्यंत हिरव्या कैऱ्यांची आवक होत आहे. गावरान कैरीला साधारणपणे एक हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. इतर फळांची तीनशे क्विंटलपर्यंत आवक होत असून केसर आंब्याची १३० क्विंटलपर्यंत आवक होतेय. गावरान आंब्याची तीस क्विंटलपर्यंत आवक होतेय. केसरला तीन हजार ते ८ हजार ३०० तर गावरानला ३० हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. मोंसबीची १५ ते २० क्विंटल आवक होऊन दीड हजार ते २ हजार, संत्र्यांची १० ते १२ क्विंटल आवक होऊन १ हजार ते ८ हजार, डाळिंबाची ९ ते १० क्विंटलची आवक होऊन २५०० ते ११ हजारांचा दर मिळत आहे. कलिंगडाची ३४ क्विंटलपर्यंत आवक होऊन सहाशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे. जांभळाची १० ते १२ क्विंटलपर्यंत आवक होत असून प्रती क्विंटलला ५ हजारांपासून १४ हजारापर्यंत दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com