Cotton Market : कापूस दर आणखी वाढण्याचे संकेत

आंतरराष्ट्रीय बाजारात ७ टक्क्यांपर्यंत दरात चढ उतार झाले. देशातील बाजारात मात्र शेतकऱ्यांचं मनोबल वाढवणारं चित्र होतं. देशातील बाजारात कापसाचे भाव वाढले होते.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

अनिल जाधव
पुणेः मागील आठवडाभर देशात आणि आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात (Cotton Market) मोठ्या घडामोडी घडल्या.

आंतरराष्ट्रीय बाजारात ७ टक्क्यांपर्यंत दरात चढ उतार झाले. देशातील बाजारात मात्र शेतकऱ्यांचं मनोबल वाढवणारं चित्र होतं.

देशातील बाजारात कापसाचे भाव (Cotton Rate) वाढले होते. 

Cotton Market
Cotton Market : कापसाचे दर आणखी वाढतील का?

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भावात रोज चढ उतार होत असताना देशात मात्र कापूस दरात सुधारणा झाली.

त्यामुळं आपण सुरुवातीला देशातील कापूस बाजाराचा आढावा घेऊ.

मागील आठवड्यात सोमवारी बाजार सुरु झाला तेव्हा, म्हणजेच २ जानेवारीला कापसाचा देशातील सरासरी भाव ७ हजार ६०० ते ८ हजार ३०० रुपये होता.

पण कापूस दरात रोज काहीशी वाढ होत गेली. आज, म्हणजेच ७ जानेवारीला कापसाचा सरासरी भाव ८ हजार ६०० ते ९ हजार १०० रुपयांवर पोचला.

म्हणजेच, सरासरी भावात मागील आठवडाभरात क्विंटलमागं ८०० ते १००० रुपयांची सुधारणा झाली.

आजही देशातील अनेक बाजारांमध्ये कापूस दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा झाली.

राज्यातील बाजारातही आज वाढ पाहायला मिळाली. आज काही बाजारांमध्ये कापसाच्या भावानं ९ हजार रुपयांचा टप्पा पार केला होता.

हा त्या बाजारांमधील कमाल भाव होता. अर्थातच हा दर तेवढ्याच कापसाला मिळाला. 

Cotton Market
Cotton Market : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर वाढले !

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी चढ उतार
आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दर जवळपास ७ टक्क्यांपर्यंत तेजी मंदी होती.

दरातील हे चढ उतार थोडे जास्तच होते, असं जाणकारही समजतात.

मंगळवारी म्हणजेच ३ जानेवारीला नवीन वर्षाच्या सुट्ट्यांनंतर बाजार ८४.३४ सेंट प्रतिपाऊंडवर सुरु झाला. रुपयात हा दर १५ हजार ३०० रुपये होतो.

मात्र त्यानंतर दरात घसरण होत, गुरुवारी ८०.४७ सेंट अर्थात १४ हजार ५९७ रुपयांवर दर घसरले.

पण गुरुवारनंतर दरात सुधारणा होत गेली. शुक्रवारी दरात मोठी वाढ होऊन बाजार ८५.६८ सेंटवर बंद झाला. रुपयात हा दर १५ हजार ५४२ रुपये होतो.

म्हणजेच मंगळवारच्या तुलनेत कापूस दर २४२ रुपयाने वाढले. 

दरवाढीला पोषक स्थिती
चालू आठवड्यात देशातील कापूस बाजार सुधारला. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारही सुधारणेसही बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढण्याचीही शक्यता व्यक्त होतेय. चीनमधून मागणी येऊ शकते.

ही स्थिती पुढील आठवड्यात कापूस बाजाराला आधार देणारी ठरु शकते. त्यामुळं दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांचे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com