Soybean Rate : सोयाबीन दरातली नरमाई तात्पुरती?

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानंही यंदा देशातील सोयाबीन पुरवठा विक्रमी पातळीवर पोचल्याचं म्हटले आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

अनिल जाधव
पुणे ः चालू महिन्यात सोयाबीनचे नरमलेले दर (Soybean Rate) आजही कायम दिसतात. त्यामुळं सोयाबीनचे दर कधी सुधारतात याची वाट शेतकरी पाहत आहेत. मात्र नेमकं याच काळात बाजारात काही चर्चा पसरवून संभ्रम निर्माण केला जातोय. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानंही यंदा देशातील सोयाबीन पुरवठा विक्रमी पातळीवर पोचल्याचं म्हटले आहे. 

Soybean Rate
Soybean Market : देशातील सोयाबीन दरातील नरमाई थांबली | Agrowon | ॲग्रोवन

यंदा देशातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्यानं केल्याचं दिसतंय. देशात दिवाळीनंतर सोयाबीनचे दर वाढले होते. मात्र आंतरराष्ट्रीय खाद्यतेल आणि सोयाबीन बाजारातील नरमाईमुळं मागील काही दिवसांपासून दर नरमले. तसंच एरवी डिसेंबरमध्ये बाजारातील आवक जास्त असते. त्यामुळं यंदाही उद्योगांना कमी दरात सोयाबीन मिळण्याची आशा होती. पण यंदा उलटं झालं. दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री कमी केली.

Soybean Rate
Soybean Market : सोयाबीनच्या दरात नरमाई

सोपाच्या मते देशात १२० लाख ४० हजार टन सोयाबीन उत्पादन झालं. गेल्या हंगामातील उत्पादन जवळपास ११९ लाख टनांवर होतं. मात्र अनेक जाणकार आणि अभ्यासकांना हा अंदाज मान्य नाही. देशातील सोयाबीन उत्पादन सोपाच्या अंदाजापेक्षा कमी असल्याचं त्यांचं म्हणणंये. तसंच सोपानं यंदा गेल्यावर्षातील २५ लाख टन सोयाबीन शिल्लक राहिल्याचं म्हटलंय. तसंच या शिल्लक सोयाबीनचा बाजारावर ताण असल्याचंही व्यापारी सांगतात. पण जाणकार आणि अभ्याकांच्या मते गेल्यावर्षीचं २५ लाख टन नाही तर १२ ते १५ लाख टन सोयाबीन शिल्लक आहे. म्हणजेच देशातील एकूण उत्पादनाच्या १० टक्के सोयाबीन शिल्लक राहीलं होतं.

सोपा आणि व्यापारी या शिल्लक सोयाबीनला बाजारावरील ताण समजत असलं तरी जाणकारांच्या मते देशात एवढा साठा असणं गरजेचं आहे. एखाद्यावर्षी अचानक संकट आल्यास शिल्लक साठा आवश्यक असतो. तो ब्राझील, अमेरिका, अर्जेंटीना या मोठ्या देशांकडे असतो. त्यामुळे त्याचा मोठा बाऊ करण्याची गरज नाही.

सोपाचा अंदाज - ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये ३७ लाख टन सोयाबीन बाजारात आले. - गेल्याहंगामात या दोन महिन्यांमध्ये २९ लाख टन सोयाबीनची शेतकऱ्यांनी विक्री केली होती. - सोयाबीनचं गाळप यंदा ६ लाख टनांनी वाढले - सोयाबीन गालप २० लाख टनांवर पोचले - १६ लाख टन सोयापेंड उत्पादन - १२ लाख टन सोयापेंडचा वापर - २ लाख टन सोयापेंडची निर्यातही झाली - सोयापेंड निर्यात मागील वर्षातील निर्यातीपेक्षा जास्त

दरपातळी म्हणजेच सोपाच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात बाजारातील सोयाबीन आवक, गाळप आणि निर्यातही जास्त झाली. नेमकं याच स्थितीचा देशातील सोयाबीन बाजाराला फायदा मिळतोय. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सोयाबीन आणि खाद्यतेल बाजाराचा दबाव आहे. त्यामुळं सध्या देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळतोय.

Soybean Rate
Cotton Rate: जागतिक कापूस दरातील नरमाई तात्पुरती | Agrowon | ॲग्रोवन

दर कधी वाढणार चालू महिन्यात दरात चढ उतार दिसतील, मात्र जानेवारीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर आणखी सुधारण्याचा अंदाज आहे. खाद्यतेलाचेही दर वाढतील. त्यामुळं देशातील बाजारातही सोयाबीनचे दर पुन्हा सुधारू शकतात. ही स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचं नियोजन केल्यास फायदेशीर ठरेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

Soybean Rate
Soybean Market : सोयाबीनच्या दरात नरमाई

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com