Cotton Market: आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दराची झेप

चालू आठवड्यात आंंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली होती. सोमवारी ८२.१७ सेंटवर सुरु झालेला बाजार शुक्रवारी ८६.७६ सेंटवर बंद झाला.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

अनिल जाधव
पुणेः चालू आठवड्यात आंंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या (Cotton Market) दरात सुधारणा पाहायला मिळाली होती. सोमवारी ८२.१७ सेंटवर सुरु झालेला बाजार शुक्रवारी ८६.७६ सेंटवर बंद झाला.

सहाजिकच आठवडाभर कापसाच्या दरात (Cotton Rate) चढ उतार पाहायला मिळाले. मात्र देशातील बाजारात कापूस बाजारानं निराशाच केली.

शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असताना दर मात्र स्थिर होते. पण पुढील काळात देशातील कापूस दर सुधारण्याचा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Cotton Market
Cotton Rate : कापूस दर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत

देशातील बाजारात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दर नरमले होते. सरासरी ८ हजार ५०० ते ८ हजार ९०० रुपयांवर असणारे दर क्विंटलमागं ५०० रुपयाने कमी झाले.

चालू आठवड्यातही दरातील ही नरमाई कायम राहीली. देशात चालू आठवड्यात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला.

शुक्रवारी कापसाच्या कमाल दरात काहीशी वाढ झाली. मात्र सरासरी दरपातळी कायम होती.

कापसाच्या दरात चढ उतार सुरु असताना सरकीचे दर मात्र टिकून होते. सरकी पेंडेला सध्या चांगला दर मिळतोय.

तर सरकी तेलाचेही दर टिकून आहेत. त्यामुळं सरकीला उठाव आहे. मागील काही दिवसांपासून सरकीचे दर तेजीत आहेत.

चालू आठवड्यात देशात सरकीला सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

Cotton Market
Cotton Market : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर वाढले !

देशात सरकीचे दर तेजीत आहेत. तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचेही दरही वाढले. मात्र देशातील कापसाचे भाव वाढले नाहीत.

उलट नरमलेल्या पातळीला चिकटून आहेत. त्यामुळं दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली. पण कमाल दरात काहीशी वाढ झाल्यानं दरवाढीची आशाही जागवली.

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी वाढ
चालू आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले होते. तसं पाहिलं तर कापसाच्या दरात आठवडाभर चढ उतार पाहायला मिळाले.

सोमवारी कापसाचे वायदे ८२.१७ सेंटवर सुरु झाले. क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर हा दर १४ हजार ७२४ रुपये प्रतिक्विंटल होतो.

त्यानंतर मंगळवारी दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. तर बुधवारी दर पुन्हा कमी झाले. गुरुवारी दरानं वाढीचा ट्रेंड दाखवला.

शेवटी शुक्रवारी बाजारानं एक महिन्यातील उच्चांकी टप्पा गाठला. शुक्रवारी बाजार ८६.७६ सेंट प्रतिपाउंडवर बंद झाला. म्हणजेच वायदे १६ हजार १२१ रुपये प्रतिक्विंटलवर बंद झाले.

म्हणजेच मागील आठवडाभरात कापसाचे वायदे जवळपास १४०० रुपयाने वाढले होते.

देशातील दर वाढणार
चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर वाढले. मात्र देशातील दर नरमलेल्या पातळीवर कायम होते.

पण पुढील काळात कापूस दरात सुधारणा दिसू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनसह महत्वाच्या कापूस वापरकर्त्या देशांकडून मागणी वाढण्याचा अदाज आहे.

तसंच देशातील कापूस उत्पादनाचा अंदाजही कमी करण्यात आला. त्यामुळं देशातील दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

त्यामुळं शेतकऱ्यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विक्री करु नये, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com