गव्हाच्या सरकारी खरेदीत मोठी घट

पंजाब हरियाणा, मध्ये प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही प्रमुख गहू उत्पादक राज्य आहेत. मात्र यंदा या राज्यांमधून गव्हाच्या सरकारी खरेदीत घट झाली आहे.
गव्हाच्या सरकारी खरेदीत मोठी घट
Wheat Procurement Agrowon

सरकारी गहू खरेदी (Wheat Procurement) २०२२-२३ वर्षात आतापर्यंत ५३ टक्क्यांनी कमी होऊन १८२ लाख टन इतकी झाली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी सरकार गहू खरेदी करते. भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य सरकारच्या काही संस्था ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करत असतात.

रब्बी गव्हाची खरेदी साधारणत: एप्रिल ते मार्च या वर्षभरात चालते. परंतु सर्वाधिक गहू खरेदीचे लक्ष्य जूनपर्यंत गाठण्यात येत असते. मागील वर्षी गव्हाची सरकारी खरेदी ४३३.४४ लाख टन इतकी होती. यंदा मात्र त्यात घट झाली आहे.

चालू वर्षात गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे आणि निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गहू खरेदीचे लक्ष्य गाठणे सरकारला शक्य झाले नाही. पंजाब हरियाणा, मध्ये प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही प्रमुख गहू उत्पादक राज्य आहेत. मात्र यंदा या राज्यांमधून गव्हाच्या सरकारी खरेदीत घट झाली आहे. या प्रमुख गहू उत्पादक राज्यात २०२२-२३ या वर्षांतील सरकारची गहू खरेदी १३२ लाख टनावरून घसरून ९६ लाख टनावर आली आहे.

हरियाणामध्ये मागील वर्षी ८४ लाख टन गहू खरेदी झाली होती यंदा मात्र त्यामध्ये घट होऊन सरकारी खरेदी ४० लाख टनापर्यंत घसरली आहे. उत्तरप्रदेशमध्ये ३३ लाख टनावरुन २.६४ लाख टनापर्यंत घसरली आहे. तर मध्यप्रदेशमध्ये ११८ लाख टनावरुन ४० लाख टनापर्यंत सरकारी खरेदी घसरली आहे.

१३ मे रोजी केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. मात्र त्याआधी गहू निर्यातीच्या उद्देशाने खाजगी कंपन्यांनी गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. त्यामुळे सरकारी खरेदीत घट झाल्याचे जाणकार सांगतात.

Wheat Procurement
भारतीय बंदरांवर २१ लाख टन गहू अडकून पडला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com