बाळहिरडाप्रश्‍नी मंत्रालयात पुढील आठवड्यात बैठक

बाळहिरडाप्रश्‍नी किसान सभेच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बुधवारी (ता. १५) मुंबईत भेट घेतली.
बाळहिरडाप्रश्‍नी मंत्रालयात पुढील आठवड्यात बैठक
Balhirda ProcurementAgrowon

पुणे : बाळहिरडा खरेदीचा (Balhirda Procurement) विषय हा आदिवासी (Tribal) भागातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आहे. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल. त्याबाबत पुढील आठवड्यात आदिवासी विकासमंत्री यांच्यासोबत मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल, असे आश्‍वासन किसान सभेच्या शिष्टमंडळास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले.

बाळहिरडाप्रश्‍नी किसान सभेच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बुधवारी (ता. १५) मुंबईत भेट घेतली. या वेळी किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे, आंबेगाव तालुका किसान सभेचे उपाध्यक्ष राजू घोडे व आंबेगाव तालुका सचिव अशोक पेकारी उपस्थित होते.

बाळहिरड्याच्या खरेदीविषयी मागील काही दिवसांपासून विविध स्तरांवर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र त्याकडे प्रशासनाकडून पुरेसा प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे शासनाने याबाबत त्वरित दखल घ्यावी. यामध्ये सभेच्या आदिवासी भागात उत्पादित होणारा बाळहिरडा महामंडळाने त्वरित खरेदी सुरू करून त्यास रास्त दर द्यावा. बाळहिरडा उत्पादक शेतकरी यांचे हीत लक्षात घेऊन दीर्घकालीन बाळहिरड्याचे धोरण निश्‍चित करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमावी. निसर्ग चक्रीवादळात झालेली बाळहिरड्याची नुकसानभरपाई मिळावी, या तीन प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com