एक लाखावर शेतकऱ्यांना हरभरा विक्रीची प्रतीक्षा

राज्यातील हरभरा खरेदी मुदतीपूर्वीच बंद केल्याने अद्याप एक लाख १० हजार नोंदणीकृत शेतकरी हरभरा विक्रीसाठी केंद्र सुरू होण्याची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत.
एक लाखावर शेतकऱ्यांना हरभरा विक्रीची प्रतीक्षा
Chana ProcurementAgrowon

अकोला ः राज्यातील हरभरा खरेदी (Chana Procurement) मुदतीपूर्वीच बंद केल्याने अद्याप एक लाख १० हजार नोंदणीकृत शेतकरी (Registered Farmer) हरभरा विक्रीसाठी (Chana Selling) केंद्र सुरू होण्याची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत. रब्बीत उत्पादन केलेला हरभरा हमीभावाने (Chana MSP) विक्रीसाठी राज्यात पाच लाखांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी जवळपास चार लाख शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आलेला आहे.

हमीभावाने खरेदीसाठी पहिल्या टप्प्यात २९ मे आणि दुसऱ्या टप्प्यात १८ जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. ही मुदत पूर्ण होण्याआधीच तीन जूनपासून उद्दिष्ट झाल्याच्या कारणाने पोर्टल बंद करण्यात आले आहे. राज्यात नाफेड व एफसीआय या दोन खरेदीदार एजन्सी मिळून ७३ लाख ४८ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाल्याची माहिती मिळाली आहे. केंद्राने दुसऱ्या टप्प्यात जवळपास सात लाख क्विंटल उद्दिष्ट वाढवल्याने हा पल्ला गाठता आला. तरीही अद्याप नोंदणी झालेल्यांपैकी २० टक्के शेतकऱ्यांचा हरभरा विक्री झालेला नाही. नोंदणी केलेल्यांचा हा हरभरा खरेदीसाठी केंद्राकडून उद्दिष्ट वाढवण्याची गरज आहे. याबाबत राज्य शासनाकडून संबंधित विभागाने केंद्राकडे सुमारे ४ लाख ४० हजार क्विंटल हरभरा खरेदीचे नव्याने उद्दिष्ट देण्याची मागणी केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अद्याप याबाबत कुठलाही निर्णय मात्र झालेला नाही.

केंद्राकडून वाढीव परवानगीबाबत काय निर्णय घेतल्या जातो यावरच आता पुढील काळात हरभरा खरेदीचे भवितव्य अवलंबून आहे. दुसऱ्या टप्प्यात दिलेले हरभरा खरेदीचे उद्दिष्ट ३ जूनलाच पूर्ण झाल्याने त्या दिवशी दुपारी पोर्टल बंद करण्यात आले. यामुळे त्या तारखेत खरेदी केलेल्या हरभऱ्याची नोंदसुद्धा पोर्टलला करता आलेली नाही. ही नोंद करण्यासाठी एक, दोन दिवसांत पोर्टलवर सुविधा मिळण्याची शक्यता आहे. मात्र ज्यांनी नोंदणी केली व विक्री करता आलेली नाही, अशा शेतकऱ्यांबाबत तातडीने निर्णयाची गरज आहे.

हरभरा घेणार नसाल, तर फरक द्यावा

येत्या काळात पाऊस सुरू झाल्यास हरभरा विक्रीची मोठी समस्या तयार होऊ शकते. सध्या बाजारात हरभरा सरासरी ४३०० रुपयांपर्यंत विकत आहे. हमीभावापेक्षा जवळपास ९०० रुपयांची तफावत आहे. यामुळेच शेतकरी आता शासनाकडे भावफरक देण्याची मागणी करू लागले आहेत. शासन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा घेऊ शकत नसेल तर त्यांना किमान एक हजार रुपये प्रतिक्विंटल भावफरक द्यावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com