Chana : हरभऱ्यासाठी तारण कर्ज योजना सुरू करावी

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने बाजार समित्यांना दिले आहेत.
Chana Rate
Chana RateAgrowon

पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी हरभरा उत्पादक (Chana Producer Farmer) शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना (Agriculture Commodity Mortgage Scheme) सुरू करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने बाजार समित्यांना दिले आहेत.

शेतमाल तारण कर्ज योजनेची अर्धवट अंमलबजावणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांनी पणन संचालक सुनील पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पणन मंडळाने आदेश जारी केले.

‘‘शेतमाल तारण कर्ज योजनेबाबत तत्कालीन पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड यांनी १२ सप्टेंबर २०१८ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व अधिनियमन) कायदा १९६३ च्या कलम ४० (ई) अन्वये शेतमाल तारण कर्ज योजना प्रत्यक्षात राबविण्याचे आदेश दिले गेले होते. त्याचा लाभ सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना करून देण्याची जबाबदारी बाजार समित्यांची आहे. मात्र, समित्यांकडून या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नाही,’’ असे आपेट यांनी निदर्शनास आणून दिले.

Chana Rate
Chana Rate : कळमना बाजारात हरभरा दरात सुधारणा

राज्यात गेल्या महिन्यात हमीभाव खरेदी बंद होताच शेतकऱ्यांकडून उरलेला हरभरा नाइलाजास्तव खुल्या बाजारात विक्रीला आणावा लागत होता. हरभरा कमी भावाने थेट आडत्यांकडे जातो. तेथे व्यापारी प्रतिक्विंटल ४२०० ते ४५०० रुपयांनी हरभरा खरेदी करीत आहेत. मात्र, हमीभाव ५२३० रुपये आहेत. त्यामुळे क्विंटलमागे शेतकऱ्यांची ८०० रुपयांची लूट होते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा होणारा तोटा टाळण्यासाठी समित्यांनी हरभरा स्वतःच्या गोदामांमध्ये ठेवून शेतकऱ्यांना रीतसर वजन पावती द्यावी. तसेच, या मालाच्या किमतीच्या ७५ टक्के तारण कर्ज शेतकऱ्याला दिले पाहिजे, अशी मागणी श्री. आपेट यांनी चर्चेत केली.

Chana Rate
Chana Rate : खुल्या बाजारात हरभरा आवक का वाढली?

राज्यात मार्चपासून हरभरा विक्रीला येत आहे. अंदाजे २० टक्के माल अद्यापही शिल्लक असताना हमीभाव खरेदी बंद झालेली आहे. पणन संचालकांनी आपला मुद्दा योग्य मानून राज्यातील बाजार समित्यांनी तारणावर हरभरा घेण्याबाबत सूचना देण्याचे मान्य केले. ‘‘बाजार समितीच्या कलम ३४ (ड) मध्ये अशी तरतूद आहे की हमीभावापेक्षा कमी दराने लिलाव पुकारताच येत नाहीत. तसेच, बाजार समित्यांनी २०१८ च्या आदेशानुसार ही योजना राबविली नाही तर थेट समितीचे संचालक मंडळदेखील बरखास्त होऊ शकते. ४० (ई) अंमलबजावणी न झाल्यास पुढे संचालक मंडळाला कलम ४५ अन्वये थेट कारवाईला सामोरे जावे लागू शकते. परंतु, या कायदेशीर बाजूकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फावले आहे,’’ असा मुद्दा शेतकरी संघटनेने मांडला आहे.

आदेश निघाला; पण अंमलबजावणी नाही

राज्यातील बाजार समित्या तारण कर्ज योजना परिपूर्णरित्या चालू ठेवण्याबाबत पणन खात्याने आदेश काढले; मात्र त्याची अंमलबजावणी राज्यभर झालेली नाही, असे कालिदास आपेट यांचे म्हणणे आहे. ‘‘शेतकऱ्यांच्या ताब्यात अजूनही सोयाबीन, हरभरा, उडीद, मूग, तूर आदी शेतमाल आहे. त्याची बाजारात आवकदेखील मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र, तारण कर्ज व हमीभाव खरेदी योजना अर्धवट राबविल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होतो आहे,’’ असे आपेट यांचे म्हणणे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com