
नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात टोमॅटो (Tomato), फ्लावरसह (Cauliflower) कारले, घेवड्याच्या दरात तेजी कायम राहिली. मागील आठवड्यात दर दिवसाला सुमारे सोळाशे ते साडेसोळाशे क्विंटलची आवक झाली. फळांची (Fruit Arrival) दररोज तीनशे क्विंटल आवक होत होती.
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला १७५ क्विंटलच्या जवळपास आवक होऊन १ हजार ते पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. वांगीची ५० क्विंटलपर्यची आवक होऊन ५०० ते आडीच हजार तर फ्लॉवरची ८० क्विंटलपर्यंत आवक होऊन ८०० ते ४५०० रुपयाचा दर मिळाला. काकडीची ६० क्विंटलची आवक होऊन ५०० ते २५००, गवारची ५ ते १० क्विंटलची आवक होऊन १५०० ते ६ हजार, घोसाळ्याची ३ ते ६ क्विंटलची आवक होऊन १२०० ते ३ हजार ५००, दोडक्याची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ४ हजार, कारल्याची सहा क्विंटलची आवक होऊन २ हजार ते चार हजार, भेंडीची ४१ ते ५० क्विटंलपर्यत आवक होऊन १८०० ते ४२०० रुपये, घेवड्याची १ ते ३ क्विंटलपर्यत आवक होऊन ६ हजार ते १० हजार, बटाट्याची ५४० ते ५६० क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार २१०० रुपये, हिरव्या मिरचीची ६८ ते ७५ क्विटंलपर्यत आवक होऊन १५०० ते ५ हजार, शेवग्याची २० ते २५ क्विटंलपर्यत आवक होऊन २ हजार ते ६ हजार, दुधी भोपळ्याची १५ ते २० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते १५०० रुपयांचा दर मिळाला आहे. शिमला मिरचीची ६७ ते ७० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजाराचा दर मिळाला. पालेभाज्या मेथी, कोथिंबीर, पालक, चुका, करडीभाजी, शेपू,कढीपत्ता याला चांगली मागणी राहिली.
फळांची आवक स्थिर
नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती फळांची आवक स्थिर आहे. येथे दररोज जांभळाची ७ ते ९ क्विटंलपर्यत आवक होत असून जांभळाला ५ हजार ते १३ हजार रुपयाचा दर मिळत आहे. मोसंबी २५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते पाच हजार रुपये क्विंटलला दर मिळाला. संत्राची २ ते चार क्विंटल, डाळिंबाची २ क्विंटलच्या आत आवक आहे. डाळिंबाला १२ हजारापर्यंत दर मिळत आहे. कलिंगडाची आवक २० क्विंटलपर्यंत आली आहे. आंब्यात केशर आंब्याची आवक १६० क्विंटलपर्यंत होत असून दोन हजार ते साडे सात हजार रुपयांपर्यंतचा क्विंटलला दर मिळत आहे. गावरान आंब्याची दर दिवसाला पंधरा क्विंटलपर्यंत आवक होत असून १ हजार ते ३ हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.