Onion Buffer Stock: बफर स्टॉकसाठी ५२ हजार टन कांद्याची खरेदी

गेल्या काही वर्षांपासून सरकार कांद्याचा बफर स्टॉक करत आहे. तुटवड्याच्या काळात कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत, यासाठी हा साठा करण्यात येतो.
 Onion
OnionAgrowon

केंद्र सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही संरक्षित साठ्यासाठी (बफर स्टॉक) कांदा खरेदी (Onion Procurement) सुरू केली आहे. आतापर्यंत ५२ हजार ४६० टन कांद्याची खरेदी करण्यात आली आहे. नाफेडच्या (NAFED) माध्यमातून ही खरेदी करण्यात येते. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. (Onion Procurement For Buffer Stock)

 Onion
कृषी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्री सुरू

गेल्या काही वर्षांपासून सरकार कांद्याचा बफर स्टॉक (Onion Buffer Stock) करत आहे. तुटवड्याच्या काळात कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत, यासाठी हा साठा करण्यात येतो. केंद्र सरकारने २०२२-२३ मध्ये अडीच लाख टन रबी कांद्याची खरेदी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. नाफेडने ३१ मे पर्यंत ५२ हजार ४६० टन कांदा खरेदी केला आहे. चालू वर्षासाठी निर्धारित केलेले उद्दिष्ट पुढील महिन्यापर्यंत गाठले जाईल, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

 Onion
पावसाच्या पाण्यामुळे चाळीतील २१ ट्रॉली कांदा वाहून गेला

२०२१-२२ मध्ये, कांद्याच्या किंमती स्थिर राहाव्यात म्हणून सुमारे दोन लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ मध्ये कांदा उत्पादनात १६.८ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. सुमारे ३११ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात सुमारे २६६ लाख टन उत्पादन झाले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com